Viral video: ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हटले जाते. लग्नासाठी शास्त्रोक्त पद्धत भारतीय परंपरेत आहे. परंतु काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. कॉलेज किंवा इतर ठिकाणी ‘नजरे से नरज मिली’ असे होऊन प्रेम झाले अन् नंतर लग्न झाले, असे होत आहे. हल्लीच नाहीतर पूर्वीही घरातून परवानगी नाही मिळाली तर प्रेमवेडे पळून जाऊन लग्न करायचे. घरापासून दूर जाऊन नव्याने संसार सुरु केला तरी आपल्या डोक्यावर कुटुंबीयांचा हात नाही किंवा पाठीसी कोणी हक्काचं व्यक्ती नाही ही खंत कायम असते.

आपलाही विवाहसोहळा इतरांप्रमाणे थाटात व्हायला हवा होता ही सलही काहींच्या मनात असते. मात्र एका जोडप्याला ६४ वर्षानंतर आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्यांच्या राजेशाही थाटातील लग्नाचा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.गुजरातमधील हर्ष आण मृन्नू लहानपणीच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण त्यांच्यात धर्माची भिंत आडवी येत होती. अखेर ६४ वर्षांपूर्वी त्यांनी घऱ सोडून पळून जाण्याचं ठरवलं. पण अखेर त्यांच्या नातवंडांनी त्यांची स्वप्नवत लग्नाची इच्छा पूर्ण केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. व्हायरल व्हिडीओत अत्यंत सुंदरपणे त्यांचा प्रवास मांडण्यात आला आहे. व्हिडीओत त्यांच्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे सर्व फोटो आहेत, जे पाहताना भावूक व्हायला होतं.

कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हर्ष नावाचा जैन मुलगा आणि मृन्नू नावाची ब्राह्मण मुलगी १९६० च्या दशकात शाळेत असताना प्रेमात पडले. त्याकाळी जास्त प्रेमविवाह होत नव्हते यावेळी पत्रांमधून त्यांच्यातील प्रेमसंबंध फुलले. जेव्हा मृन्नू यांच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नाला नकार दिला तेव्हा त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. प्रेम आणि दृढनिश्चयाशिवाय दुसरं काहीही नसलेले जीवन सुरू करण्यासाठी हे जोडपे पळून गेले. अत्यंत साधेपणाने त्यांचा विवाह झाला. त्यावेळी मृन्नू यांच्या साडीची किंमत फक्त १० रुपये होती. त्यावेळी कोणताही भव्य समारंभ नव्हता, फक्त एकत्र राहण्याचं वचन होतं. मात्र आता इतक्या वर्षांनी त्यांची मुलं आणि नातवंडांनी राजेशाही थाटात विवाहसोहळा आयोजित करत त्यांच्या आयुष्यात राहिलेली ती अपूर्ण इच्छा पूर्ण केली.

पाहा व्हिडीओ

आयुष्य म्हणजे एक मोठा पट. या पटावर प्रत्येकाच्या वाट्याला सुख, दुःख, संघर्ष, समाधान यांचं एक अनोखं मिश्रण येतं. सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात, असं कधीच नसतं. काहीतरी कमी किंवा जास्त असतंच. जोडीदाराचा परफेक्ट असणं म्हणजे तो श्रीमंत, सुंदर किंवा समाजानं मान्य केलेल्या चौकटीत बसणारा असावा, असं मुळीच नाही. जो आपलं मन जाणतो, आपल्या भावना समजतो आणि त्याला महत्व देतो तोच खरा जोडीदार असतो. संसारात अनेक संकटं, छोट्या मोठ्या अडचणी येत असतात, पण अशा वेळी जो जोडीदार आपल्या सोबत खंबीरपणे उभा राहतो, तोच नातं टिकवू शकतो.