Viral video: वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. अशात ते पंढरपूरी जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स करताना दिसतात.
दरम्यान सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे या कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभ मेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभ मेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभ मेळ्यासाठी देशातूनच नव्हे, तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. यंदाचा कुंभ मेळा अनेक अर्थांनी खास आहे. कारण- यंदाचा कुंभ हा महाकुंभ असणार आहे.याच कुंभमेळ्यात महाराष्ट्रातील एका आजी-आजोबांनी महाराष्ट्राची वारकरी परंपरा प्रयागराज कुंभमेळ्यात पोचवली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजी आजोबांचं कौतुक कराल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजी आजोबा कुंभमेळ्यात दर्शनासाठी आलेले असताना त्याच परिसरात फुगडी घालताना आणि अभंग म्हणताना दिसत आहेत. दोघांचंही वय झालंय मात्र त्यांचा उत्साह असा आहे की तरुणाईलाही लाजवेल. या आजी आजोबांना पाहून आजूबाजूची लोकंही थांबली आहेत. नवरा-बायकोचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं असं म्हणतात. दोघंही एकमेकांशी यथेच्च भांडतात पण प्रतिकूल परिस्थितीत ते दोघंच एकमेंकाना साथ देतात. आजकालचा जमाना हा डिजिटल रिलेशनशिप्सचा आहे. परंतु जेव्हा हा डिजिटलचा जमाना नव्हता तेव्हा मात्र प्रेमाची परिभाषाचं ही वेगळी होती. डोळ्यातलं प्रेम, पत्रातून लिहिलेल्या भावना, नात्यातला आगळा गोडवा इत्यादी. आता मात्र डेटिंग अॅप्स, चॅटिंग, पॉर्न अशा अनेक गोष्टींमुळे नाती आणि प्रेम यांच्या परिभाषा कैक पुढे गेल्या आहेत. बदलल्या आहेत. परंतु जुन्या काळातील प्रेम हे आजच्या काळातही भक्कमपणे टिकून आहे आणि रूजलेलं आहे. आजही तरूणपिढीला यातून प्रेरणा मिळते आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर राम कृष्ण हरी माऊली अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.