Viral Video: समाजमाध्यामांमुळे लाखो नवनवीन व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात, आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात, तर काही व्हिडीओ नकळत डोळ्यांत पाणी आणतात. अशा व्हिडीओंमध्ये कधी एखाद्या मुक्या प्राण्यावर किंवा व्यक्तीवर अत्याचार होत असल्याचे पाहायला मिळते. तर कधी एखाद्या निष्पाप व्यक्तीचा लोक गैरफायदा घेताना दिसतात. पण, म्हणतात ना ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी कधीही लपून राहत नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही करत असलेल्या चुकीच्या वाईट गोष्टीही कधीही लपून राहत नाहीत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून अनेक जण व्हिडीओतील निष्पाप व्यक्तीला त्रास देणाऱ्या व्यक्तींचा तिरस्कार करताना दिसत आहेत.
गरीब, हतबल व्यक्तीचा नेहमीच अनेक जण गैरफायदा घेतात. स्वत:वर होत असलेला हा अत्याचार लक्षात येऊनही असे हतबल लोक त्रास देणाऱ्या व्यक्तींचा अत्याचार सहन करतात. ज्यामुळे अशा लोकांचा माज दिवसेंदिवस वाढत जातो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील काही व्यक्ती एका वृद्ध व्यक्तीवर असाच अत्याचार करताना दिसत आहेत, जे पाहून नेटकरी त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मद्यपानाच्या दुकानामध्ये चार-पाच जण उभे असून, ते तिथे उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला मुद्दाम त्रास द्यायला सुरुवात करतात. यावेळी ते त्या व्यक्तीचे लक्ष दुसरीकडे असताना त्या व्यक्तीच्या डोक्यात मारतात. त्यावर ती वृद्ध व्यक्ती मला का मारलं, असं म्हणत त्या व्यक्तीच्या हातावर फटका मारतो. त्यानंतर ते लोक वृद्धाच्या डोक्यात मारू लागतात आणि त्याला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अनेकविध स्वरूपाच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: ब्लॉग शूट करता करता लहान भावा-बहिणीमध्ये कडाक्याचं भांडण; मजेशीर VIDEO पाहून हसाल पोट धरून
पाहा व्हिडीओ:
नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “मायबापाने केलेले संस्कार दिसून येत आहेत भावांचे…” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुमच्या बापाच्या वयाचे आहेत ते, तुमच्या बापाला असंच मारता का तुम्ही आणि तुमच्या बापाची अशीच मजा घेतात का?” तिसऱ्याने लिहिलेय, “वडिलांसारखे आहेत, भान असू द्या”
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangram_creation___ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास पाच लाखांहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत.