Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. तसेच यातील कोणती गोष्ट लोकांना आवडेल आणि ट्रेंड होईल याचाही अंदाज लावता येत नाही. अनेकदा लोकांना अतरंगी आणि देशी जुगाड पाहायला फार आवडतात. कारण यात कधी कोण कारपासून हेलिकॉप्टर बनवतो, तर कोणी विटांपासून कूलर… सध्या अशाच एका जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात एका काकांनी जुगाडपासून अशी एक भन्नाट सायकल तयार केली आहे, जी पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तुम्ही आत्तापर्यंत डबल डेकर बस पाहिली असेल, पण यात चक्क एक डबल डेकर सायकल पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये एक काका रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहेत, पण ही सायकल साधारण नसून जुगाडपासून बनवली आहे. व्हिडीओ पाहून लोकांना प्रश्न पडला की, ही सायकल नेमकी बनवली कशी? तसेच ते काका या सायकलवर चढले कसे?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काका एकावर एक जोडलेली सायकल चालवताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी या सायकलला डबलडेकर सायकल असे म्हटले आहे. ही डबल डेकर सायकल काका अगदी आरामात चालवताना दिसत आहेत. सामान्य सायकलपेक्षा उंच असूनही काका ती सहजतेने चालवताना दिसत आहेत. पण, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की, काका आता या सायकलवरून खाली उतरणार कसे?
भन्नाट सायकलचा हा व्हिडीओ @dc_sanjay_jas या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही सायकल नेमकी कशी बनवली असा प्रश्न लोकं विचारत आहेत. या सायकलमध्ये अॅटलसची फ्रेम कापून ती नॉर्मल सायकलला जोडण्यात आली आहे. या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, ‘सर, हे महान काका सायकलवर कसे चढले… हे घरी शक्य आहे… पण, रस्त्यावर असताना अशाप्रकारच्या सायकलवर आधाराशिवाय चढू शकत नाहीत…’, दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘सर, बाकी सर्व ठीक आहे, पण आता ते खाली कसे उतरतील? ‘