दिल्ली मेट्रोमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात, ज्यामध्ये विविध प्रकारच्या लोकांचा समावेश असतो. त्यामुळे मेट्रोत कधी कोण आणि काय करेल हे सांगता येत नाही. शिवाय मागील काही दिवसांपासून मेट्रोतील विचित्र घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. नुकतेच एका जोडप्याने मेट्रोमध्ये एकमेकांना किस केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वयस्कर व्यक्तीच्या हातामध्ये काडीपेटी आणि बिडी असल्याचं दिसत आहे. शिवाय ती व्यक्ती चक्क धावत्या मेट्रोत बिडी पेटवताना दिसत आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
धावत्या मेट्रोत पेटवली बिडी
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील असल्याचे सांगितलं जातं आहे. व्हिडिओमध्ये, एक आजोबा मेट्रोतून प्रवास करताना खिशातून काडीपेटी आणि बिडी काढतात आणि चक्क मेट्रोमध्येच ती पेटवतात. यानंतर तो बिडी तोंडात घालतात. मात्र यावेळी त्यांच्या शेजारी असलेला इतर प्रवासी त्यांना मेट्रोत बिडी ओढू नका असं सांगतो.
आजोबांचा स्वॅग –
मेट्रोमध्ये बिडी ओढणाऱ्या आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओ शेअर करून लोक त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेक लोक याला आजोबांचा अनोखा स्वॅग म्हणत आहेत. तर काही लोक दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, अशा लोकांमुळेच आगीच्या घटना घडतात.
याआधी दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक जोडपे दाराजवळ उभे राहून सर्वांसमोर एकमेकाला किस करत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, त्यानंतर अनेक प्रवाशांनी आणि नेटकऱ्यांनी जोडप्यावर टीका केली होती.