Railway crossing accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण एकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असेच एक आजोबा रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगात वंदे भारत एक्सप्रेस आली अन् पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा.

तुम्ही केव्हाही रेल्वेनं प्रवास करा. तुम्हाला एक घोषणा नेहमी ऐकू येईल ती म्हणजे, ‘कृपया रेल्वे रूळ ओलांडू नका, ते घातक ठरू शकते.’ रेल्वेच्या या इशाऱ्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि अडचणीत येतात. एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना एक ट्रेन आली आणि भयंकर प्रकार घडला. एक वयोवृद्ध व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या पलीकडून रेल्वेरुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर येत असतो. मात्र प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या आधीच एका बाजून एक ट्रेन येत असते. मात्र काही क्षणाच्या अंतराने व्हिडिओत दिसणारे आजोबा धावत्या वंदे भारतच्या धडकेपासून अवघ्या १ सेंकदाच्या फरकाने वाचतात. आजोबा गोंधळून पुन्हा मागे फिरले असते तर कदाचीत त्यांना धडक बसली असती मात्र आजोबा तसेच पुढे आले अन् थोडक्यात बचावले. हा व्हिडीओ पाहून आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? हे कळेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ thirumal_king_thirumal_king नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elderly man narrowly escapes death before vande bharat swooshes by shocking video goes viral on social media srk