Elderly man performed a stunt viral video: आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत असतात. कधी कॉमेडी, तर कधी डान्स व्हिडीओ, तसेच इन्फॉर्मेटिव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकदा आपण लगेच स्क्रोल करतोc परंतु काही धक्कादायक व्हिडीओ कायम लक्षात राहतात.
आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धीसाठी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो.
हेही वाचा… एक डुलकी, एक अपघात! मुंबई लोकलमध्ये झोप लागताच माणसाचा गेला तोल अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का
अनेकदा असे धोकादायक स्टंट तरुण जास्त प्रमाणात करतात. बाईक वेडीवाकडी चालवणं, कोणत्या उंच इमारतीवरून उडी मारणं, भररस्त्यात स्टंट करणं असे तरुणांचे अनेक व्हिडीओ आपण पाहिलेच असतील; पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कोणताही तरुण नाही, तर एक आजोबा धक्कादायक स्टंट करताना दिसत आहेत. एक वयोवृद्ध चालत्या ट्रेनच्या दरवाजावर उभ राहून अगदी धोकादायक स्टंट करीत आहेत.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय. या व्हिडीओमध्ये ट्रेनच्या दरवाजावर एक आजोबा स्टंट करताना दिसतायत. चालत्या ट्रेनमध्ये दारावरील पायरांवर उतरून हे आजोबा स्टंट करीत आहेत. तर कधी दरवाजावर चढून जीवावर बेततील अशी स्टंटबाजी त्यांची सुरू आहे. हा व्हिडीओ अनेकांना थक्क करणारा आहे.
हा व्हिडीओ @mumbai.hai.bhai_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “आता ही परिस्थिती आहे, तर तारुण्यात काय काय केलं असेल?” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल ३.२ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, आजोबा अगदी तंदुरुस्त आहेत. तर दुसऱ्याने खतरों के खिलाडी, अशी कमेंट केलीय. तर एकाने “एका व्हिडीओसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात,” अशी कमेंट केली. “चाचा अगदी जोशमध्ये आहेत.” तर या वयातही आजोबा अशा प्रकारची स्टंटबाजी करतायत हे पाहून अनेकांना धक्का बसला.