Accident News: सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ भयानक असतात. मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, असाच एक काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. नोयडामध्ये रस्ता क्रॉस करत असताना एका ७६ वर्षीय महिलेला कारने धडक दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचं फुटेज आता समोर आलं आहे.

ही घटना नोएडा सेक्टर ७८ मधील महागण मॉडर्न सोसायटी परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ दिसत आहे. यावेळी एक वृद्ध महिला रस्त्याने जात आहे, यादरम्यान डाव्या बाजूला असणाऱ्या रस्त्यातून एक कार येते. या कार चालकाने महिलेला पाहिलं नसल्याची शक्यता व्हिडीओमधून वाटत आहे. तो त्या रस्त्यावरून बाहेर येतो आणि थेट महिलेला धडक देतो.

Fact check video boy remove a nut and bolt from huge pole
VIDEO: धक्कादायक! भरदिवसा तरुणाने कापल्या विजेच्या खांबाचे केबल्स अन् नट; पण घटनेची खरी बाजू काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sangli islampur
चावडी: इस्लामपूरची ताकद कुणाच्या पाठीशी…
Young Man Swept Away by Flood
एवढी घाई कशाची! पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण, वेळीच लोक धावून आले; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
14-foot crocodile enters human settlement through flood waters
बापरे! पुराच्या पाण्यातून १४ फुटांच्या मगरीचा मानवी वस्तीत शिरकाव; Video पाहून अंगावर येईल काटा
dombivli railway police returned jewellery to woman forget in local train
लोकलमध्ये विसरलेले तीन लाखाचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून दिव्याच्या महिलेला परत
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
Afghanistan Taliban Rules For Women
Afghanistan Taliban Rules For Women : आता स्त्रियांच्या आवाजावरही बंदी, तालिबानच्या नव्या फतव्यात महिलांवर जाचक निर्बंध!

एवढंच नाही तर कारचे समोरील चाक महिलेच्या छातीवरून गेले. व्हिडीओ पाहून या अपघाताची भीषणता लक्षात येते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘मी सर्वांना वाचवू शकलो नाही…’ म्हणत अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर ढसाढसा रडला; इस्रायलमधला ह्रदय पिळवटणारा VIDEO व्हायरल

अपघात झाल्याचं समजताच वाहन चालकाने कार थांबवली. या अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली. ज्या व्यक्तीच्या कारची धडक बसली होती, त्याने महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. याबाबत कुटुंबीयांनी सायन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.