Viral Video: सोशल मीडियावर कधी काय वाचायला वा पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. अलीकडे तर अनेक जण प्रसिद्धीसाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊन रील्स बनविताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आपण यापूर्वी दिल्ली मेट्रोतील डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले आहेत. या व्हिडीओंवर नेटकरी नेहमीच संताप व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; पण हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील नसून चक्क विमानातील आहे आणि तेथे एक महिला डान्स करताना दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली लोक सोशल मीडियावर व्ह्युज, लाइक्स व फॉलोअर्ससाठी कुठे काय करतील हे सांगता येत नाही. अनेकदा काही जण व्हिडीओसाठी जीवघेणे स्टंट करताना दिसतात; तर काही जण कोणतीही पर्वा न करता, सार्वजनिक ठिकाणी अश्लील नृत्य करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला असंच काहीतरी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वयस्कर महिला इंडिगो कंपनीच्या विमानातून प्रवास करीत आहे. यावेळी ती सर्व प्रवासी आपापल्या जागेवर बसले असताना मधल्या पॅसेजमध्ये उभी राहते आणि डान्स करायला सुरुवात करते. यावेळी तिला नाचताना पाहून सर्व प्रवासी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहतात; तर काही जण मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करतात. पण, तरीही ती न लाजता तिचा नाच सुरूच ठेवते. हा व्हिडीओ त्या नर्तक महिलेनं स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

हेही वाचा: मला माझ्या आईकडे जायचंय! शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकलीने केला शिक्षकांकडे हट्ट; VIDEO पाहून हसाल पोट धरून

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @salma.sheik.9216 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि १७ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “हे विमान आहे; दिल्ली मेट्रो किंवा तुमचे घर नाही.” दुसऱ्याने लिहिलेय, “अरे देवा, दिल्ली मेट्रो इथेही व्हायरल झाली.” तिसऱ्याने लिहिलेय, “लोकांना त्रास देणे बंद करा. तुमचा हा अश्लीलपणा पाहून लोकांना खूप लाज वाटते.” चौथ्या युजरने लिहिलेय, “आंटी रॉक; प्रवासी शॉक.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elderly woman dances on plane netizens expressed anger after seeing the viral video sap
Show comments