Elderly Woman Refuses Free Travel In Bus : देशातील अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मतदारांना मोफतचं आमिष देण्याचं राजकारण सुरू झालं आहे. मोफत विजेपासून तर दुचाकी, सिलेंडरपासून लॅपटॉप मोफत देण्याच्या घोषणा करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयही याविरोधात कठोर आहे. पण, राजकीय पक्षांना अजूनही निवडणुकीतील फायद्यासाठी ‘मोफत’च्या आश्वासनांची मालिका थांबवायची नाही. पण या प्रवृत्तीच्या विरोधात असलेल्या एका आजीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमधल्या आजींनी दाखवलेला स्वाभिमान हा ‘मोफत’चं आमिष देणाऱ्या राजकारणाच्या निषेधार्थ उत्तम उदाहरण ठरू शकतं, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हिडीओ तामिळनाडूमधील सरकारी बसमधील आहे. या व्हिडीओमध्ये आजी बस कंडक्टरसोबत वाद घालताना दिसत आहे. सहसा बसमध्ये कंडक्टरसोबत असे वाद होत असतात. पण वाद मात्र काहीसा वेगळा आहे. या वादाचं कारण थोडं वेगळं आहे आणि अविश्वसनीय आहे. देशात मतांसाठी ‘मोफत वाटप संस्कृती’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप राजकीय पक्षांवर होत असताना देशाचे सर्वोच्च न्यायालयही याबाबत कठोर पावलं उचलत आहे. या आजींचा स्वाभिमान म्हणजे अशा नेत्यांच्या नेतृत्वाला सणसणीत चपराक बसल्यासारखी आहे.

आणखी वाचा : रौद्ररूपी इयान वादळी वाऱ्याशी झुंजणाऱ्या माणसाचा VIDEO VIRAL; लोक म्हणाले, “नाश्त्याला काय खाऊन निघाला होता?”

खरंतर हा व्हिडीओ याच कारणामुळे व्हायरल होत आहे. कारण यामध्ये आजींना या बसमधून मोफत प्रवास करायचा नाहीय. हा व्हिडीओ तामिळनाडूतील कोईम्बतूर शहराचा आहे. आजी तमिळमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे, पण तरीही या आजींना काय नकोय, हे सहज समजून येतं. या आजींना कंडक्टरला पैसे देऊन तिच्या प्रवासासाठी योग्य तिकीट घ्यायचं आहे. त्या कोणत्याही परिस्थितीत फुकट प्रवास करायला तयार नाहीत. ‘मला ओसीमधून जायचे नाही, असे या महिलेचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : Queen Victoria स्टाईलमध्ये या ८९ वर्षीय आजीने साजरा केला वाढदिवस, VIRAL VIDEO ला २३ मिलियन व्ह्यूज

खरं तर तामिळनाडूमध्ये पांढऱ्या पाट्या असलेल्या सामान्य सरकारी बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे. निवडणुकीदरम्यान द्रमुकने हे आश्वासन दिलं होतं. पण, सरकारचा हा मोफत प्रवास या आजींना अजिबात मान्य नाही.

मधुकराई ते पलाथुराई दरम्यान धावणाऱ्या सरकारी बसमधील सहप्रवाशाने हा व्हिडीओ बनवला असून, या प्रदीर्घ चर्चेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्हिडीओमध्ये कंडक्टर एका पुरुष प्रवाशाला तिकीट घेण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी मग आजी त्याच्याकडे पोहोचली आणि तिकीट देण्यास सांगून पैसे देऊ लागली. सुरुवातीला कंडक्टरने त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला आणि प्रवासासाठी पैसे देण्याची गरज नसल्याचे समजावून सांगितले. परंतु, महिलेने स्पष्टपणे सांगितले की ती ‘ओसी’ (विनामूल्य) प्रवास करणार नाही.

आणखी वाचा : हे काय? चक्क माणसांना पाहून सिंह घाबरला! विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!

अखेर कंडक्टरने आजीसमोर हार पत्करली. त्याने आजींकडून १५ रुपये भाडे घेऊन तिकीट दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्या आजींच्या आत्मसन्मानाचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ @dr_abimanyus नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमधल्या आजी स्थानिक भाजप नेता असल्याचा दावा केला आहे.