Viral Video: सोशल मीडियाच्या जगात कधी काय बघायला मिळेल हे कोणालाच माहीत नाही. अनेकवेळा असे व्हिडिओ समोर येतात जे आश्चर्यचकित करणारे असतात. आता आम्ही असाच एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आजी काय करते हे पाहून काही लोकं तिला योग्य ठरवत आहेत. चला तर मग पाहूया आजीने काय असं केलं की व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आजीने काय केले?
आजीला राग आला आणि तिने आपला सगळा राग स्कूटीवर काढला असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? क्षणभर आमचा विश्वास बसेना पण या व्हिडीओने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला दिसत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावरुन जाताना एका जागी अडकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ती रस्त्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला हलता येत नाही.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वृद्ध महिला स्वत: साठी रस्ता बनवण्याचा प्रयत्न करते. पण तिला निघताच येत नाही. तिला राग येतो आणि रागाच्या भरात आजी स्कूटर खाली पाडते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्याची माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पुष्टी करू शकत नाही. ही बातमी व्हिडिओच्या आधारे तयार करण्यात आली आहे.
(हे ही वाचा : विमानातील अनाऊन्समेंटची ही नवी पध्दत तुम्ही कधी पाहिली आहे काय? पाहा Video…)
येथे पाहा व्हिडिओ
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं काय म्हणाले?
हा व्हिडिओ एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्वीटर) वर शेअर केला आहे. व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका यूजरने लिहिले की, “आजीचा राग स्वाभाविक आहे, आजीने जे काही केले ते योग्यच होते. एका यूजरने लिहिले की, “या लोकांमुळे ट्रॅफिक जाम होते, हे लोक कुठेही गाड्या पार्क करतात.”
एका यूजरने लिहिले की, “आजीला या कामासाठी पुरस्कार द्यायला हवा, आम्ही तिथे असतो तर आतापर्यंत गदारोळ झाला असता.” आणखी एका एक्स वापरकर्त्याने लिहिले की, “या लोकांमुळे लोकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो आणि चालण्यास त्रास होतो.” अनेक वापरकर्त्यांनी व्हिडिओवर आजीला न्याय दिला आहे.