काही वयस्कर लोक इतके अ‍ॅक्टिव्ह असतात की, त्यांचा उत्साह पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.सध्या अशाच काही वृद्ध महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये या महिल्या मोकळ्या रस्त्यावर स्केटिंग करताना दिसत आहेत. या ‘आजी’ची स्टाइल पाहून तुम्हीही नक्कीच अवाक् व्हाल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो खरेखुरे नसून आर्टिफिशल इंटेलिजन्सची कमाल आहे. AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी क्रांती झाल्याचे पाहायला मिळते. आर्टिफिशल इंटेलिजन्सने (AI) अनेकांचे आयुष्यच बदलून टाकले आहे, असे म्हणायला हरकत नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल निर्मितीच्या जगातील काही अशक्य गोष्टी शक्यप्राय होताना दिसत आहेत. यात सोशल मीडियावर AI च्या मदतीने काढलेल्या काही हटके फोटोंची यादीच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या नव्या तंत्राच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होताना दिसत आहेत. AI च्या मदतीने कलाकार डिजिटल माध्यमामध्ये काम करत कलाकृती तयार करत आहेत. सोशल मीडियावर सध्या असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.जे पाहून आपणही आश्चर्यचकीत होतो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा फोटो –

हेही वाचा – viral video: बिकनी गर्लनंतर दिल्ली मेट्रोत ‘या’ मुलांची चर्चा, चक्क स्कर्ट घालून मारली एन्ट्री

आशिष जोस नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या या वृद्ध महिला प्रत्यक्षात आर्टिफिशल इंटेलिजन्सची कमाल आहे. या महिला खऱ्याखुऱ्या नसून काल्पनिक आहेत यावर विश्वासच बसत नाही. या पोस्टला आतापर्यंत ८५ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elderly women skating as seen in ai generated picture viarl srk
Show comments