Elections 2024 : प्रत्येक निवडणुकांच्या वेळी जितकी उमेदवारांविषयी चर्चा होते तितकीच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) संदर्भात चर्चा होत असते. या मशीनच्या विश्वासार्हतेवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. पण, तरीही देशभरात अनेक राज्यांमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया पार पडते. यामुळे मतदारांमध्ये ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असे असतानाही काही लोक मतदान करताना गोंधळतात. यामुळे एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून आपण ईव्हीएम मशीन वापर कसा केला जाते हे जाणून घेऊ….

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये तीन प्रकारच्या मशीन्स असतात, ज्यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्होटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेलचा (VVPAT) समावेश आहे.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

१) कंट्रोल युनिट

कंट्रोल युनिट हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधील महत्त्वाचा भाग असतो. यात एक डिस्प्ले असतो. तो ॲक्टिव्ह करताच तुम्हाला मशीनबद्दल संपूर्ण माहिती मिळते. बॅटरी किती चार्ज झाली आहे, आतापर्यंत किती मते पडली आहेत, इत्यादी माहिती डिस्प्ले केली जाते. बॅलेट युनिट फक्त कंट्रोल युनिटद्वारे कार्यान्वित केले जाते. ते ॲक्टिव्ह केल्यानंतरच प्रक्रिया पुढे जाते.

VIDEO : १०० किमीचा वेग, ११००० व्होल्टेज वायर अन्…; तरुणाने ट्रेनच्या छतावर झोपून धोकादायक स्थितीत केला प्रवास

२) बॅलेट युनिट कसे काम करते?

बॅलेट युनिट कंट्रोल युनिटमधूनच अ‍ॅक्टिव्ह केले जाते. बॅलेट युनिट अ‍ॅक्टिव्ह होताच, त्याच्या वरती एक हिरवा लाइट दिसू लागतो. बॅलेट युनिटमध्ये उमेदवाराचे नाव, फोटो आणि निवडणूक चिन्ह हे क्रमवार दिलेले दिसते. उमेदवाराच्या निवडणूक चिन्हापुढे निळे बटण दिसते. तुम्ही आवडत्या उमेदवारासमोरील निळे बटण दाबताच बीपचा आवाज येईल आणि मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.

३) VVPAT म्हणजे काय?

पूर्वी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट नव्हते. पण, त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यात व्होटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेलचा (VVPAT) समावेश करण्यात आला, जे कंट्रोल आणि बॅलेट युनिटदरम्यान ठेवले जाते. बॅलेट युनिटचे बटण दाबताच, मतदाराला VVPAT मशीमध्ये एक स्लिप दिसून येते, त्याद्वारे मतदाराने ज्या उमेदवाराच्या नावापुढचे बटण दाबले आहे त्याच्या नावाची पुष्टी करू शकतो. तुम्ही ज्या उमेदवाराच्या नावापुढचे बटण दाबता, त्या उमेदवाराच्या नावाची एक स्लिप VVPAT मशीनमध्ये दिसते आणि ती काही सेकंद डिस्प्ले होत कापली जाते आणि खालच्या सेक्शनमध्ये जमा होते. प्रिंटर कम बॉक्स अशा प्रकारची ही मशीन आहे. मतमोजणीच्या वेळी या मशीनमधील स्लिप मोजल्या जातात. मतदाराला मतदान करताना व्हीव्हीपीएटीमध्ये मत दिलेल्या उमेदवाराचे नाव दिसले नाही तर तो ताबडतोब तेथील संबंधित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतो. अशा परिस्थितीत व्हीव्हीपीएटी मशीन लगेच उघडून स्लिप मोजल्या जातात.

मतदान करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

सर्वप्रथम मतदानासाठी कंट्रोल युनिटमधून बॅलेट युनिट ॲटिव्ह केले जाते. यानंतर बॅलेट युनिटमध्ये हिरवी लाइट दिसून येते. यानंतर मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरील निळे बटण दाबून मतदान करतो. बीप वाजताच त्यांचे मतदान पूर्ण होते. लक्षात ठेवा बटण एकदाच दाबायचे असते. एकापेक्षा जास्त वेळा बटण दाबू नका. बटण दाबल्यानंतर व्हीव्हीपीएटी मशीनमध्ये एक स्लिप कापली जाईल, जी मतदारांना पाहता येईल. यावरून मतदार खात्री करू शकतात की, त्यांनी ज्या उमेदवाराचे बटण दाबले त्याच्या नावाची स्लिप कापली गेली आहे की नाही.

@vishalvidhateofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहेत. ज्यात निवडणूक आयोगातील अधिकारी संजीव यांनी मशीनसंदर्भात थोडक्यात माहिती दिली आहे.

Story img Loader