Electric Bike Battery Catches Fire Video : आजकाल ई-बाईकचा ट्रेंड वाढताना दिसतोय; पण काही दिवसांपासून ई-बाईकच्या बॅटरीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या बॅटरीचा कधी स्फोट होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावरही तुम्हाला ई-बाईकचा अचानक स्फोट झाल्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, आता ई-बाईकच्या बॅटरीसंदर्भात असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका घरात चार्जिंगला लावलेल्या ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर वेढले गेले. त्यानंतर घराची जी अवस्था झाली, ती पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी अचानक फुटली. त्यामुळे आग घरात पसरली. हा व्हिडीओ सुरतचा असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. व्हिडीओत दिसतेय की, एका रूममध्ये अचानक धूर पसरल्याचा दिसतेय. अचानक धूर वाढत जातो, तेवढ्यात अचानक स्फोटाचा आवाज येतो. बॅटरीचा असा भीषण स्फोट पाहून घरातील लोकही घाबरले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही जर ई-बाइकची बॅटरी चार्ज करीत असाल, तर काळजी घ्या.

@chakahaksurat नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चार्जिंग करताना बॅटरीचा स्फोट झाला. इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी घरीच चार्ज करण्याची चूक करू नका.

अनेकांनी या धक्कादायक व्हिडीओवर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने म्हटलेय की, घराला आग लागली आहे आणि हा माणूस फायर ब्रिगेडला कॉल करण्याऐवजी रील रेकॉर्ड करण्यात व्यग्र आहे. दुसऱ्याने एका युजरने लिहिले की, इलेक्ट्रिक बाइक खरेदी करू नका. तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, त्याने घरातील मेन इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायला हवा होता.