Electric Car Carrot Halwa Desi Jugaad Video : भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही, काही लोक जुगाड करण्यात इतके पटाईत असतात की, ते भंगारातूनसुद्धा कोणतीही वस्तू बनवू शकतात. अनेकदा जुगाडमधून अशा काही गोष्टी बनवल्या जातात, ज्यांची लोकांनीही कल्पना केली नसेल. सोशल मीडियावरही एकापेक्षा एक कमालीचे जुगाड व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात इलेक्ट्रिक कारचा असा वापर केला आहे की, पाहून तुम्ही अवाक् व्हाल, कारची निर्मिती करणाऱ्या कंपनीनेही आयुष्यात कधी विचार केला नसेल की, त्यांच्या कारचा लोकं असाही वापर करू शकतात. हा जुगाड पाहून तुम्हीही नक्कीच आश्चर्य व्यक्त कराल.
जगभरात सध्या इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड खूप वाढतोय. पेट्रोल, डिझेलचे गगनाला भिडलेले दर पाहता, लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार वापरू लागले आहेत. कार कोणत्याही कंपनीची असो; तिचा प्रवासासाठीच वापर होतो हे आपण पाहिले असेल; मात्र एका कुटुंबाने प्रवासाव्यतिरिक्त इलेक्ट्रिक कारचा असा काही वापर केला आहे, की ते पाहून सर्वच जण अवाक् झाले आहेत. कुटुंबाने इलेक्ट्रिक कारचा केलेला असा वापर पाहून कारची निर्माती कंपनीसुद्धा डोक्यावर हात मारेल. फार्महाऊसमधील वीजपुरवठा अचानक बंद झाल्याने एका महिलेने घराबाहेर बसून चक्क इलेक्ट्रिक कारच्या मदतीने गाजराचा हलवा बनवला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका फार्महाऊसबाहेर इलेक्ट्रिक कार उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी फार्महाऊसमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या कुटुंबाने चक्क घराबाहेर चूल मांडली आहे आणि गाजराचा हलवा बनवण्याची तयारी सुरू आहे. एका मोठ्या भांड्यात चुलीवर दूध गरम होतेय आणि दुसरीकडे कुटुंबातील दोन महिलांनी गाजर किसण्याचे कष्ट वाचवण्यासाठी जुगाडाचा वापर केला आहे. पण, हा जुगाड साधासुधा नाही; कारण- गाजर किसण्यासाठी त्यांनी चक्क इलेक्ट्रिक कारची मदत घेतली आहे.
व्हिडीओमध्ये महिला गाजर किसण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक कारच्या मागच्या बाजूला असलेल्या प्लगमध्ये ग्राइंडर जोडला आणि गाजर बारीक करण्यास सुरुवात केली. फार्महाऊसमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांनी हा भन्नाट जुगाड शोधून काढला.
२५ फूट लांब, ४५ इंच जाड, महाकाय अजगराचा झाडावर चढतानाचा धडकी भरवणारा VIDEO, पाहून तुमचाही उडेल थरकाप
दरम्यान, यात व्हिडीओ बनवणारी व्यक्तीदेखील कारबद्दल सांगताना ऐकू येत आहे. तो म्हणतोय की, ज्या टीमने ही कार बनवली, त्यांनी कधीच विचार केला नसेल की, कारचा अशा प्रकारेही वापर केला जाईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
कार कंपनीनेही कधी विचार केला नसेल की, इलेक्ट्रीक कारचा असाही वापर होऊ शकतो.
k
व्हिडीओत दिसणारी इलेक्ट्रिक कार किआ कंपनीची आहे. हा व्हिडीओ @HasnaZaruriHai नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक जोरदार कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलेय की, भारतातील लोक किती हुशार आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. आणखी एका युजरने लिहिले की, भारतीय काहीही करू शकतात. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, किती आश्चर्यकारक तंत्रज्ञान. शेवटी एकाने लिहिले की, या कारमध्ये ‘सप्लाय फॉर कॅम्पिंग’चे फीचर असते. जर लाइट नसेल, तर ते इन्व्हर्टर म्हणून वापरले जाऊ शकते.