Electric Cycle: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला उत्तम खेळाडू म्हणून ओळखले जाते. धोनीला त्याच्या कार आणि बाईकसाठी देखील ओळखले जाते. कारण त्याला कार आणि बाईकची प्रचंड आवड आहे. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक कार आणि बाईकचा संग्रह आहे. अनेकदा तो या कार आणि बाईकवर फिरताना दिसतो. सोशल मीडियावर धोनी पुन्हा अशाच एका कारणामुळे चर्चेत आला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा यष्टिरक्षक-फलंदाज भारतात तयार करण्यात आलेली फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला. एका व्हिडिओमध्ये माही रस्त्यावर कॅज्युअल लूकमध्येE-Motorad Doodle V3 सायकल चालवताना दिसत आहे. धोनीला या व्हिडिओला गेल्या काही दिवसांत सुमारे १.७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. एका कार चालकाने धोनीचा व्हिडीओ शुट केल्याचे दिसते. सायकल चालवताना धोनीने हेल्मेट परिधान केले आहे. लेदर जॅकेट परिधान केले आहे. धोनीचा हा लूक त्याचा चाहत्यांना नक्कीच आवडला आहे.
हेही वाचा – ५ रुपयाचे लिंबू करेल केटलची चकचकीत सफाई! पाहा व्हायरल जुगाड व्हिडीओ
त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या
E-Motorad Doodle V3 ही फोल्डेबल इलेक्ट्रिक बाइक आहे ज्याचा कमाल वेग ताशी २५ किमी आहे. हे पारंपारिक पॅडल सायकलप्रमाणे वापरले जाऊ शकते. पॅडलशिवाय ते पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडमध्ये देखील चालवले जाऊ शकते. ही इलेक्ट्रिक सायकल डुडल कंपनीची आहे. या सायकलची किंमत ४९,९९९ रुपये इतकी आहे.
यात १२ .७५ एएच बॅटरी पॅक मिळतो आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ६० किमी पर्यंतची रेंज देते. ई-बाईकमध्ये ७-स्पीड शिमॅनो गियर सिस्टम देखील आहे. याशिवाय यात एलसीडी डिस्प्ले देखील आहे. यात अनेक आधुनिक दुचाकींप्रमाणे USB चार्जिंग पोर्ट देखील आहे.
धोनी बाईक चालवताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही आणि अनेकदा त्याचे असे व्हिडीओ व्हायरल होतात. पण, त्यांच्या संग्रहातील नव्या ई सायकलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.