जम्न आणि मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. पण मरण कधी सांगून येत नाही. कधी कोणाचा काळ येईल हे सांगता येत नाही. एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यूचा सामना करावा लागतो. रोज कित्येक अपघात होत असतात ज्यामुळे लोक आपला जीव गमावतात. अशा अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही लोक अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अनेकदा लोक धोकादायक स्टंट करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर एका व्यक्तीचा धक्कादायक व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण अशा ठिकाणी वर्कआऊट करताना दिसत आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. वर्कआऊट करणे चांगली गोष्ट आहे पण वर्कआऊट करण्याचे देखील योग्य ठिकाण असते. स्वत:चा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या या माणसाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, एका माणसाने लाईव्ह पॉवर केबल्सवर पुल-अप्स करून व्यायाम आणि फिटनेसची त्याची आवड एका विचित्र पातळीवर नेली आहे. या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि वापरकर्त्यांना आश्चर्यचकित केले.
व्हिडिओमध्ये, व्हिडीओमध्ये एक माणऊस एका उंच विजेच्या खांबावर चढतो. खांबावर पाय ठेवतो आणि विजेच्या तारांना पकडून सहजतेने पुशअप्स मारतो आहे. त्याची एक चूक त्याच्या जीवावर बेतू शकते हे माहित असूनही त्याच्या चेहऱ्यावर कसली भीती दिसत नाही. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांना त्या माणसाच्या कृत्य आवडले नाही आणि ते धोकादायक असल्याचे म्हटले. “हे खूप धोकादायक आहे,” एका वापरकर्त्याने लिहिले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने विचारले, “तो तिथे कसा पोहोचला?”
इंटरनेटवरील अनेक वापरकर्त्यांना त्याची मजेदार बाजू सापडली आणि त्यांनी व्हिडिओवर मजेदार कमेंट्स दिल्या. एका वापरकर्त्याने म्हटले, “ही नक्कीच एक उत्साहवर्धक कसरत असेल,” तर दुसऱ्याने म्हटले की तो “मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशाने ‘धक्का’ देणार आहे.” “तो पुढील आयुष्यासाठी प्रशिक्षण घेत आहे,” एका वापरकर्त्याने म्हटले. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “अमर्यादित ‘शक्ती’.
व्हिडिओ इतका व्हायरल झाला की कमेंट सेक्शन मीम्सने भरून गेला.