सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात. काही व्हिडीओ घाबरवणारे असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात. जंगलात एकापेक्षा एक भयंकर प्राणी असतात. अनेक धोकादायक प्राण्यांचे शिकारीचे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. रोज कोणता ना कोणता प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. प्राण्यांच्या हल्ल्यांच्या व्हिडीओंना तर नेटकऱ्यांचा भरभरुन प्रतिसाद पहायला मिळतो. नुकताच जंगलातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अवाढव्य हत्ती आणि गेंडा यांच्यातील थरार पहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हारल होणाऱ्य व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलामध्ये काही हत्ती आणि गेंडा निवांत फिरत आहेत. तेवढ्यात एक हत्ती सोंडेमध्ये काठी घेऊन गेंड्याच्या दिशेने चालायला लागतो. सुरुवातीला हत्तीला काठी घेऊन आपल्याकडे येताना पाहून गेंडा दबकतो आणि मागे होतो. हत्तीची काठी खाली पडते तो ती उचलायला जातो या संधीचा फायदा घेत गेंडा हत्तीवर हल्ला करतो. मग हत्ती काठी उचलून जोरात दूर फेकून देत गेंड्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – बापरे! झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्यावर चढला विषारी साप, बघता बघता बाळाला विळखा घातला, Video व्हायरल

प्राण्याचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओलाही आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहेत, तर नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant and rhinoceros fight gigantic elephant video viral on social media srk