Viral video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जंगल सफारीच्या एका व्हिडीओमुळं खळबळ उडाली आहे. बिबट्या,वाघ, सिंहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत मुक्त संचार करून माणसांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना किंवा जंगलात भटकत असताना वन्य प्राणी माणसांवर जीवघेणा हल्ला करतात. तसेच राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास हे प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. जंगल सफारीचा अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. जंगल सफारी करताना सफारी वेहिकलवर हत्तीनं हल्ला केला आहे. हत्तीला पाहून पर्यटकांचा थरकाप उडाला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल
एका सफारी वेहिकलमध्ये बसून काही पर्यटक जंगल सफारी करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण पर्यटकांचे सफारी वेहिकल थोडे पुढे जाताच महाकाय हत्तीनं एन्ट्री केली अन् पर्यटकांनी भरलेल्या गाडीवर हल्ला केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पर्यटकांची गाडी रस्त्यावरुन जात असताना अचानक जंगलातून एक हत्ती समोर येतो. यावेळी ड्रायव्हर गाडी रिव्हर्समध्ये चालवायला सुरुवात करतो. मात्र हत्ती पळपळत गाडीला गाठतोच. यावेळी तो त्याची महाकाय सोंड गाडीमध्ये घालतो आणि खाण्यासाठी काहीतरी शोधतो. तो ड्रायव्हरच्या पाठीमागून सोंड घालून गाडीत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तो अक्षरश: उचलून खाली फेकतो. त्यानंतर गाडीची काच फोडून आतमधील सामानाची नासधुस केली.
रम्यान संधी मिळताच ड्रायव्हरनं गाडी पळवली. त्यामुळे कुठलीही जीवीतहानी झाली नाही. सुदैवानं गाडीमधील कुटुंब थोडक्यात वाचलं. अन्यथा गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> कोरियन तरुणींना लागली उचकी! नऊवारी साडीत केली जबरदस्त लावणी; VIDEO होतोय व्हायरल
रकाप उडवणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान अशा प्राण्यांच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडला आहेत. त्यामुळे जंगल सफारी करताना किंवा रानावनात भटकताना पर्यटकांनी वाघांच्या जवळ जाऊ नये. जंगलातील नियमांचे पालन करावे, अशा सूचना वनविभागाकडून पर्यटकांना दिल्या जातात.