जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी असलेल्या हत्तीला सर्वात समजदारही मानलं जातं. हत्ती इतर प्राण्यांच्या तुलनेत अतिशय शांत, समजूतदार समजला जातो. जंगलात आपल्या कळपासोबत राहणं तो पसंत करतो, जेणेकरुन तो सुरक्षित राहू शकेल. शांत असला तरी हत्तीला रागही येतो, अनेकांच्या याबाबतच्या घटना तुम्ही ऐकल्याही असतील. असाच एका हत्तीच्या रागाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हत्तीच्या परवानगीशिवाय एक तरूणी फोटो काढत होती. मग काय हत्तीला राग आला आणि त्या तरूणीला असा धडा शिकवला की ती आयुष्यभर विसरणार नाही. हा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुला-मुलींता एक ग्रूप जंगलसफारी आलेले असताना त्यांना एक मोठा हत्ती दिसला. या महाकाय हत्तीच्या जवळ त्यांचा ग्रूप जातो. या दरम्यान लाजाळू हत्ती आपली सोंड गोलाकार वर्तुळाच्या बाहेर काढताना दिसून येतो. आपल्याला भेटण्यासाठी आलेल्या या मुला-मुलींच्या ग्रूपचं हा हत्ती स्वागत करतो. हत्तीने त्याच्या सोंडेनं केलेलं स्वागत पाहून या ग्रूपमधली मुलं-मुली खूपच आनंदी होतात. उत्साहाच्या भरात या ग्रूपमधली एक मुलगी असं काही करते की ते पाहून लाजाळू हत्ती अचानक रागाने लाल होतो. पुढे फ्रेममध्ये जे काही घडतं ते पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

आणखी वाचा : चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच

हत्तीने केलेलं स्वागत पाहून उत्साहाच्या भरात ग्रूपमधल्या एका मुलीने मोबाईल बाहेर काढला आणि हत्तीचे फोटो काढू लागली. ते पाहून हत्तीला राग येतो आणि आपल्या सोंडेने या मुलीला जोरदार कानशिलात मारतो. यावेळी मुलगी गडबडली आणि तिने तिचा मोबाईल खाली सोडून दिला. यानंतरही हत्तीचा राग काही शांत झाला नाही. तरूणीचा अद्दल घडवल्यानंतर हत्ती तिचा मोबाईलही ओढण्याचा प्रयत्न करताना दिसून आला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पेट्रोल पंपावर गाडी थांबवण्याची चूक पडली महागात, डोळ्यादेखत चोरट्यांनी गाडी पळवून नेली

आपल्या परवानगीशिवाय फोटो काढत असलेल्या तरूणाला हत्तीने जो धड शिकवलाय तो कदाचित ती आयुष्यभर विसरू शकणार नाही. हा व्हिडीओ तसा जुना असून ही घटना जून २०१९ ची आहे. आफ्रिकामधल्या झांबिया मध्ये हायस्कूलमधला हा मुला-मुलींचा ग्रूप १२ दिवसांच्या मिशन ट्रिपसाठी आले होते. यादरम्यान तरूणीला हत्तीने जी कानशिलात मारली ती एका बलवान व्यक्तीच्या १० ठोश्यांसारखीच होती. हा जुना व्हिडीओ असला तरी सध्या तो पुन्हा व्हायरल होऊ लागलाय.

आणखी वाचा : या पठ्ठ्याने दोन दिवसात बनवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL NEWS : आफ्रिकेत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी मेंढ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास

हा व्हिडीओ फेल आर्मीच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओचा आनंद घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाख २१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. अनेक लोकांनी तर यावर वेगवेगळे विनोद देखील शेअर केले आहेत. हा व्हिडीओ पाहण्यासाठी जितका मजेदार आहे, तितक्याच या व्हिडीओवरील कमेंट्स सुद्धा वाचण्यासारख्या आहेत.

Story img Loader