Viral video: जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशातच वाघ, सिंह, हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे. मात्र, प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिसाळलेल्या हत्तीने एका प्रवाशावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हत्तीचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
केरळच्या वायनाड वन्यजीव अभयारण्यात हा प्रकार घडला आहे. बुधवारी सकाळी बथेरी-म्हैसूर राष्ट्रीय महामार्गावरील मुथांगजवळ ही घटना घडली. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन लोकांकडे हत्तीची नजर गेली. हत्तीला पाहून हे दोघे पळू लागले व त्यानंतर हत्तीने त्यांचा पाठलाग सुरु केला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला जंगलात एक हत्ती दिसतो. तो रागात आहे. मोठमोठ्याने ओरडून तो कुणाचा तरी पाठलाग करत आहे. इतक्यात हत्तीच्या पुढे एक व्यक्ती पळताना दिसते. हत्तीपासून जीव वाचण्यासाठी ही व्यक्ती पळते खरी पण तिचा तोल जातो आणि ती धाडकन खाली कोसळते. तेव्हा हत्ती तिच्या मागेच असतो. पण सुदैवाने ती व्यक्ती कशी बशी स्वतःला सावरत उठते. व्यक्ती जंगलातून रोडवरील येते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तीनं धमकी दिली अन् पुढच्याच क्षणी मेट्रो स्टेशनच्या छतावरुन मारली उडी; श्वास रोखणारा VIDEO व्हायरल
हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार वाढला असून प्राणी माणसांवर हल्ला करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसच काही लोक प्राण्यांना अमानुष मारहाणही करतात. त्यामुळे प्राणी मित्र संघटनांकडून या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. प्राण्यांना जंगलात सुरक्षित संचार करता यावं, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणीही केली जात आहे.