Elephant Viral Video : घरी असल्यावर पाळीव प्राण्यांसोबत खेळायला अनेकांना आवडतं. पण घराच्या बाहेर पडल्यावरही काही जण वन्य प्राण्यांना त्यांचे मित्रच समजतात. हत्तीसारखा भला मोठा प्राणी माणसांशी त्याच्या शैलीत संवाद साधताना आपण अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून पाहिलं आहे. पण काही वेळेला ‘हाथी मेरे साथी’ धोकेबाजही निघतात. अशीच एक धक्कादायक घटना व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. एका ठिकाणी उभा असलेल्या हत्तीच्या जवळ जाऊन काही जण फोटो सेशन करण्याचा प्रयत्न करत असतात. याचदरम्यान एक तरुणी हत्तीच्या सोंडेला धरून फोटो काढण्यात मग्न असते. तरुणी ‘हाथी मेरे साथी’ अशा अविर्भावात बिंधास्तपणे फोटो काढायला जाते. पण हा हत्ती तिचा साथीदार नव्हता. सोंडेला धरून फोटो काढणाऱ्या तरुणीला हत्तीने चांगलाच धडा शिकवला. हा थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हत्तीने तरुणीसोबत जे केलं, ते पाहून नेटकरीही चक्रावून गेले, पाहा व्हिडीओ

माणसं असो वा प्राणी राग कुणालाही येऊ शकतो. पण हत्तीला राग येणार नाही, असं एका तरुणीला वाटलं आणि ती थेट हत्तीच्या जवळ जाऊन फोटो काढायला लागली. त्यावेळी तरुणीचा फोटो काढण्याचा अंदाज काही हत्तीला पसंत आला नाही. हत्तीची शान असलेली सोंड पकडण्याची हिंमत त्या तरुणीन केली खरी, पण हत्तीनेही त्या तरुणीला भन्नाट उत्तर दिलं. हा व्हिडीओ जंगलाच्या गल्लीतून इंटरनेटच्या गल्लीत वाऱ्याच्या वेगासारखा व्हायरल झाला. कारण हत्तीसोबत मस्ती करणाऱ्यांना हत्तीने कायमची अद्दल घडवल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हत्तीशी पंगा घेणं किती महागात पडू शकतो, ते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळू शकेल. हत्तीसोबत मस्ती करताना नेमकं काय घडंल, ते तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

नक्की वाचा – Video : बेडरूममध्ये नको ते उद्योग करायला गेली अन् झाली फजिती, तरुणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

हत्तीसोबत फोटो काढण्याचा मोह तरुणीला आवरला नाही. पण हा फोटोसेशन आयुष्यभरासाठी एक आठवण बनेल, याचा कधी विचारही त्या तरुणीने केला नसावा. कारण हत्तीची सोंड धरल्यानंतर काही सेकंदातच हत्तीने त्या तरुणीला थापड मारल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हत्तीचा हा व्हिडीओ वेगवेगळ्या अकाऊंट्सवर शेअर केला जात आहे. @akankshamahi नावाच्या युजरने हत्तीचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखल्या जाणारे हत्ती जेव्हा पिसळतात त्यावेळी त्यांच्यापासून चार हात लांब राहणे, हेच तुमच्यासाठी योग्य ठरू शकतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant attacked on teen girl while making video in front of him shocking video goes viral on twitter nss