Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येतात. त्यात जंगलातीलही अनेक व्हिडीओ असतात; जे अनेकांना चकित करून सोडतात. पर्यटकांचा जंगलातील प्राण्यांसोबत कशा प्रकारे सामना होतो आणि या सगळ्यांतून पर्यटक त्यांचा जीव कसा वाचवतात हेसुद्धा अनेक व्हिडीओंतून आपल्याला पाहायला मिळतं. पण, आज व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक मोठी दुर्घटना घडल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आफ्रिकन देश झांबियाच्या काफू नॅशनल पार्कमधील आहे. ३१ मार्च रोजी पर्यटक फोटोग्राफी करण्यासाठी पहाटे टूरवर निघाले. त्यादरम्यान पर्यटकांना अनेक प्राणी पाहायला मिळाले. त्यामुळे पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तसेच या पर्यटकांमधील एक व्यक्ती स्वतःच्या मोबाईलमध्ये हे सर्व शूट करून घेत होती. बघता बघता व्हिडीओत एक भयानक दृश्य कैद झालं. नक्की काय झालं एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात

हेही वाचा…सुहाना सफर! तरुणाचा मनाली ते कन्याकुमारी स्केटबोर्डने प्रवास; VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जंगलातून एक हत्ती पर्यटकांच्या सफारी ट्रकचा पाठलाग करू लागला. हत्ती जवळ आल्याचं पाहून पर्यटक घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. त्यानंतर अचानक हत्तीनं गाडीला धडक दिली आणि सफारी ट्रक उलटा केला. व्हिडीओच्या कॅप्शननुसार ‘जंगल सफारी करताना पर्यटक आवाज करीत असताना हत्तीनं त्यांच्यावर हल्ला केला; ज्यामध्ये दोन जण जखमी आणि एका ८० वर्षीय महिला पर्यटकाचाही मृत्यू झाला’, असे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ginnydmm या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ग्रुपच्या सीईओने या प्रकरणाबद्दल माफी मागितली आणि सांगितलं, “आमचे सर्व मार्गदर्शक खूप प्रशिक्षित आणि अनुभवी आहेत. पण, दुर्दैवानं हा परिसर धोकादायक होता. त्यामुळे हत्तीच्या हल्ल्यापासून आम्ही स्वतःला वाचवू शकलो नाही. आम्ही जीव गमावलेल्या पर्यटकाच्या कुटुंबाप्रति आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो”, असे सीईओ म्हणाले आहेत.