Elephant Attack On Forest Department Vehicle : आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्वीटरवर एका हत्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. जंगल सफारी करताना वन्य प्राणी कशाप्रकारे हल्ला करतात, हे या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. वाघ, सिंहासारखे हिंस्र प्राणी माणसांवर जीवघेणा हल्ला करतातच. पण हत्तीसारखा बलाढ्य प्राणी पिसाळल्यावर भयानक हल्ला करतो, हे या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. वन विभागाचे अधिकारी जंगलात पेट्रोलिंगला जात असताना एका हत्तीने त्यांच्या गाडीवर जोरदार हल्ला केल्याची घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मस्ती करण्याच्या मूडमध्ये असलेला हत्ती काही क्षणातच पिसाळलेलं रुप धारण करतो आणि गाडीच्या दरवाजाला जोरजोरात टक्कर मारतो. पण सुदैवाने त्यावेळी गाडीत कुणीच नसल्याने हत्तीला माणसांवर हल्ला करता आला नाही. हे थरारक दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. वन अधिकारी परवीन कासवान यांनी ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, असं वाटतंय की हत्तीने खेळता खेळता आमची गाडी तोडली. सुदैवाने कर्मचारी टॉवरवर होते. जंगलातील जीवन. ही पोस्ट १ ऑगस्टला शेअर करण्यात आली असून आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच १८०० हून अधिक लाईक्स या पोस्टला मिळाले आहेत.

नक्की वाचा – VIDEO: बायकोने नवऱ्याला स्टेजवरच धू धू धुतलं! पाहुण्यांसमोरच झाली ‘WWE’ फायटिंग

इथे पाहा हत्तीचा खतरनाक व्हिडीओ

अनेक लोकांनी या व्हिडीओला प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं, तो हत्ती फक्त एवढचं निश्चित करतोय की गाडीचे दरवाजे बंद आहेत. दुसरा यूजर म्हणाला, गाडी एकदम व्यवस्थित आहे. हत्ती फक्त दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न करतोय. तर तिसऱ्या एका यूजरने म्हटलं, सुरक्षेसाठी कारचे दरवाजे बंद असले पाहिजेत, असाच मेसेज तो हत्ती देण्याचा प्रयत्न करतोय. हत्ती फक्त खेळत आहे. खूप सुंदर हत्ती आहे. व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद, असंही एका यूजरने म्हटलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant broke forest department car during patrolling in forest watch shocking viral video of wild animal nss