सोशल मीडियावर हत्तींचे मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात जे नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात. कधी हत्ती सोंडमध्ये पाईप पकडून अंघोळ करताना दिसतो तर कधी हत्तीचे पिल्लू पाण्यात खेळताना दिसते. काही दिवसांपूर्वीत जमिनीवर डोक ठेवून शरीराचा सर्व भार पुढील पायांवर टाकून, मागील दोन पाय हवेत उंचावून चक्क शीर्षासन करत होता. व्हिडीओला सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रियता मिळाली होती. अनेकदा हत्ती जगंलातून मानवी वस्तीमध्ये प्रवेश करताना दिसतात. कधी जंगालातून जाणाऱ्या रस्त्यावर जाणाऱ्या गाड्यांचा रस्ता अडवतात तर कधी रेल्वे रुळ ओलंडताना दिसतात. अनेकदा अशा परिस्थितींचा हत्तींचा अपघात होतो किंवा अनेकदा हत्ती पिसाळल्याने इतरांवर हल्ला करताना दिसतात. अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर पुन्हा अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण रस्ता ओलांडणाऱ्या हत्तींना त्रास देत आहे ज्यामुळे चिडलेला हत्ती तरुणाच्या अंगावर धावून येतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहेत.
व्हायरल व्हिडिओ IFS ऑफिसर परवीन कासवान यांनी एक्स खात्यावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, जंगलाच्या मध्यभागी असलेल्या पर्यटन स्थळासारख्या दिसणाऱ्या ठिकाणी एक माणूस धावत आहे आणि एक हत्ती त्याचा पाठलाग करताना दिसत आहे. व्हिडिओ जसा जसा पुढे जात तसे लक्षात येते की, तो माणूस वारंवार हत्तीला त्रास देत आहे आणि त्याला हल्ला करण्यास प्रवृत्त करत आहे. तो माणूस काही वेळ पळत राहतो, थांबतो आणि पुन्हा हत्तीचा पाठलाग करतो. सततच्या थट्टेमुळे हत्ती संतापल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतो. पण तरीही तो माणूस त्याला चिडवत राहतो. शेवटी हत्ती त्याच्या रागावर नियंत्रण ठेवून पुन्हा त्याच्या कळपाकडे परत जातो. पण तरीही हा तरुण त्याला त्रास देत राहतो. शेवटी
कासवान यांनी लिहिले, “या व्हिडिओमधील प्राण्याला ओळखा. कदाचित तुम्ही तरुण असाल आणि तुम्ही हत्तींना मागे टाकू शकाल. पण हे चिडलेले प्राणी पुढील काही दिवस दुसऱ्या माणसांना पाहून शांतपणे वागत नाहीत. तुमच्या मौजमजेसाठी वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका.”
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, आयएफएस अधिकाऱ्याने हत्तींच्या वर्तनाचे स्वरूप स्पष्ट केले आणि त्यांना “अत्यंत बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी” असे संबोधले. त्यांनी अधोरेखित केले की, “मानवांकडून होणाऱ्या छळामुळे प्राण्यांमध्ये वर्तनात्मक बदल होऊ शकतात, ज्यामुळे ते आक्रमक बनू शकतात आणि दीर्घकालीन मानव-हत्ती संघर्ष निर्माण होऊ शकतो.”
या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे त्या तरुणाला अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. एका एक्स वापरकर्त्याने लिहिले, “मी या मुलाला प्राणीसंग्रहालयात प्राण्यांचे विष्ठा उचलण्यासाठी ६ महिन्यांसाठी कामावर पाठवेन.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “कृपया त्याला शोधा आणि अटक करा सर.”
“हे पाहून मला खूप चिंता वाटली; हत्तीच्या संयमाला सलाम,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.