सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात वन्य प्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. असाच एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हत्ती जंगलातील सर्वात शांत प्राणी म्हणून गणला जातो. पण राग आला की त्याला आवर घालणं कठीण असतं. पण एकदा का मानवी वस्तीत हत्ती आला की त्याच्या हरकती बघण्यासारख्या असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हत्ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती नटूनथटून उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मागे गाणे वाजत आहे. हत्ती आधी उभा राहून नाचू लागतो. मग हत्तीचा सारथी आल्यावर त्याच्याबरोबर नाचायला लागतो. मागचे पाय हलके दाबून हात पुढच्या पायाने नाचू लागतो. व्हिडीओ पाहून हत्ती गरबा स्टेप्स करत असल्याचं दिसत आहे. हत्तीच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओखाली नेटकरी मजेशीर कमेंट्स देत आहे.