Elephant Eating Plastic: प्लॅस्टिक प्रदूषणाचा प्रश्न केवळ वाढतच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. समुद्रात तसेच जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांची दुर्दशा दाखवणाऱ्या हजारो व्हिडीओज आणि फोटोज इंटरनेटवर उपलब्ध आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. आता या यादीत एका हत्तीचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.
IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भुकेने व्याकूळ झालेला एक हत्ती त्याच्या सोंडेच्या मदतीने एक प्लॅस्टिकचा तुकडा उचलताना दिसत आहे. काही वेळाने हत्ती प्लॅस्टिक खाण्याचा देखील प्रयत्न करतो.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : आधुनिक युगातील ‘कबीर सिंग’! एकाच वेळी १५ सिगारेट ओढताना दिसला
सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहीली आहे. “एवढ्या मोठ्या प्राण्यासाठीही प्लॅस्टिक धोकादायक ठरू शकते. यामुळे त्यांच्या अन्न नलिकांवर दुष्परिणाम होऊ शकतो. सिंगल यूज प्लॅस्टिकची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येकाला जबाबदार राहण्याचे आवाहन करत आहे.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : तलवारीने केक कापणे महागात पडले; १९ वर्षाच्या बर्थ डे बॉयविरोधात गुन्हा दाखल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : वाघ जेव्हा भडकलेल्या वाघिणीसमोर उंदरासारखा होतो तेव्हा…
हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र संतापले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत लोकांना सिंगल यूज प्लॅस्टिक वापरण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाईक करणाऱ्या नेटकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. कठोर नियम आणि वनक्षेत्रात कचरा टाकण्यासाठी अधिक शिक्षेची मागणी करणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियांनी कमेंट सेक्शन भरून गेला आहे.