केनियातील वन्यजीव अभयारण्यात एका हत्तीणीने पिल्लाला जन्म दिला. शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्ट या संस्थेने ट्विटरवर यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. ही संस्था हत्तीच्या पिल्लांचे संवर्धन त्यांच्या पुनर्वसनचे काम पाहते. २५ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक नवजात हत्तीचे पिल्लू जमिनीवर पडलेले दिसत आहे, तर बाकीचा हत्तींच्या कळपाने त्या पिल्लाला घेर घातला आहे आणि सर्वजण त्याच्याकडे पाहत आहेत. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “आमच्या डोळ्यासमोर हत्तीचे बाळ जन्मले. काल सकाळचा तो क्षण होता, जेव्हा अनाथ मेलियाने तिच्या पहिल्या पिल्लाला जन्म दिला, अविश्वसनीय दृश्य” शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्टने नवजात पिल्लाचे नाव मिलो ठेवले आहे, ज्याचा अर्थ “प्रिय” आहे.
हा व्हिडिओ ५२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्याला ४००० लाईक्स मिळाले आहेत. तसंच अनेकजण यावर वेगवेगळ्या कंमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “व्वा, मिलोला पृथ्वीवर येताना पाहणे अविश्वसनीय!! त्याचे पाय पांढरे आहेत आणि असे दिसते आहे की त्याच्याकडे नवीन शूज आहेत.”
( हे ही वाचा: वाघासोबतचा अतिउत्साही महिलेचा Video वेगळ्याच कारणामुळे चर्चेत; जाणून घ्या नेमकं घडलं काय)
( हे ही वाचा: कारमध्ये बसताना अचानक वाघाची महिलेवर झडप, फरफटत घेऊन गेला अन…काळीज थक्क करेल हा Viral Video)
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार सर्व हत्ती अचानक बाहेर जमू लागले. हेडकीपर, बेंजामिन याने मोठा आवाज ऐकला आणि एक हालचाल पाहिली. हेडकीपरला काय झाले हे समजण्यापूर्वीच इतर हत्ती धावत आले. बेंजामिनला तेव्हा समजले की हत्तीण मेलियाने पिल्लाला जन्म दिला आहे आणि हत्तीचे बाळ अजूनही पांढऱ्या नाळीत गुंडाळलेल्या स्थितीत जमिनीवर पडले आहे. खरं तर, समोर पडलेले पिल्लू पाहून हत्तीण मेलिया घाबरली होती. इतर अनुभवी हत्तींणीनी पाऊल उचलत आई झालेल्या हत्तीण मेलियाला हाताळण्यास मदत केली, अशी माहिती ट्रस्टने दिली.