कुठलाही स्टंट मारणं हे दिसतं तितकं सोपं नसतं. भरपूर सराव, संतुलन आणि योग्य टायमिंगची गरज असते. तरच तुमचा स्टंट योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकतो. अन्यथा एक लहानशी चूक तुमच्या अंगाशी देखील येऊ शकते. मात्र काही प्राणी कुठल्याही सरावाशिवाय चकित करणारे स्टंट मारुन दाखवतात. एका हत्तीच्या हॅंडस्टॅंडचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क होऊ लागलेत.

साधारणपणे हत्तीचा स्वभाव खूप शांत असतो. मात्र, हत्तीला राग आला की तो फार भयंकर रूप धारण करतो. हत्ती जेव्हा मूडमध्ये असतो तेव्हा त्याचे एक एक पराक्रम पहायला मिळतात. या व्हायरल व्हिडीओमध्येही तुम्हाला हत्तीची वेगळी स्टाईल पाहायला मिळणार आहे. या हत्तीनं चक्क हॅंडस्टॅंड करून दाखवलंय. खाली डोकं वर पाय या स्थितीत तो दिसून येत आहे. डोक्यावरच त्याच्या शरीराचा भार त्याने झेललाय. हा हत्ती फक्त डोक्यावर उभा राहिलाय. असा स्टंट माणसांनी केलेला तुम्ही पाहिलं असेल. अनेकांना तर हा स्टंट जमत नाही. पण हत्तीनं अगदी सहज हा स्टंट करून दाखवलाय.

आणखी वाचा : अरे देवा! मुलाला स्विमिंग शिकवत होती, अन् स्वतःचंच हसं करून घेतलं, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पतीने बाईकवर लिहिला असा संदेश जो वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही!

व्हिडीओमधील हत्तीची स्टाईल पाहून तुम्ही सुद्धा चक्रावले असाल. कारण, एखाद्या प्राण्याला असे करताना पाहणे अशक्य आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत. @MorissaSchwartz या नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाख ७१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १३ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. तसंच हजारो लोकांनी व्हिडीओला रिट्विट देखील केलं आहे.

Story img Loader