Viral News: तिरूर येथील पुथियांगडी उत्सवाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. उत्सवादरम्यान हत्ती पिसाळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अचानक हत्तीने एका व्यक्तीवर हल्ला केल्याने लोक सैरावैरा धावत सुटले. रस्त्यावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओमध्ये, एका उत्सवामध्ये सोनेरी कापड टाकून सजवलेले पाच हत्ती दिसत आहे. हत्तीच्या पाठीवर माहूत बसलेले दिसत आहे. लोकांची प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. लोक हत्तींचे फोटो व्हिडिओ शुट करताना दिसत आहे. दरम्यान अचानक एक हत्ती पिसाळतो आणि लोकांवर हल्ला करतो. पिसाळलेला हत्ती एका व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकून देतो. अचानक हत्तीने हल्ला केल्यानंतर लोक सैरा-वैरा धावत सुटतात. काही लोक एकमेकांच्या अंगावरही पडताना दिसत आहे. पक्कथु श्रीकुट्टन असे हत्तीचे नाव आहे. पिसाळलेल्या हत्तीच्या पाठीवर बसलेला माहूत त्याला शांत करतो. उत्सवादरम्यान २४ लोकांना किरकोळ दुखापत झाली तर एकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना दुपारी १२.३० वाजता घडली.

हेही वाचा –“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल

वृत्तानुसार या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर कोटक्कल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हत्तीने हल्ला केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी धावण्यासाठी धडपडत असताना चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने बहुतांश लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा – जगातील सर्वात उंच महिला कसा करते विमान प्रवास? Viral Video पाहून व्हाल थक्क

उत्सवादरम्यान हत्तीने जमावावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी म्हैसूर पॅलेसमध्ये दोन हत्तींमध्ये जोरदार भांडण झाले होते. व्हिडिओमध्ये कैद झालेली ही घटना व्हायरल झाली आहे.