निसर्ग आपल्याला आश्चर्यचकित करण्यात कधीही अपयशी ठरत नाही. याची प्रचिती देणारा एक व्बिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सुंदर क्षण कॅप्चर केला आहे. एक हत्ती ऐटीत आपल्याच धुंदीत चालत येत आहे अचानक तो हत्ती थांबतो कारण त्याच्यासमोर एक व्यक्ती उभी असते. पण व्यक्तीला रस्त्यातून बाजूला जा सांगण्यासाठी जे काही करतो त्या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक हत्ती शांतपणे त्याच्या वाटेने जात आहे पण एक व्यक्ती रस्त्यात उभी असल्याने तो हत्ती काही क्षण थांबतो आणि जमिनीवरील माती पायाने उदळतो आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला बाजूला होण्याची सुचना देतो. ज्या क्षणी व्यक्तीला लक्षात येते की त्याच्या मागे कोणीतरी उभे आहे तसे तो मागे वळून पाहतो तर भल्ला मोठा हत्ती उभा दिसतो जे पाहून तो घाबरतो आणि तात्काळ हत्तीची वाट सोडून पळत बाजूला जातो.
@AMAZlNGNATURE द्वारे X वर शेअर केलेला, २३-सेकंदाचा व्हिडिओ कॅप्शनसह पोस्ट केला गेला: “हत्ती नम्रपणे व्यक्तीला सांगतो की, तो रस्त्यात उभा आहे.”
व्हायरल व्हिडिओ येथे पाहा
व्हिडिओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक कमेंट्स विभागात भरडले आहेत.
एका यूजरने कमेंट केली, “मला हत्ती आवडतात. खूप सभ्य आणि हुशार. ” दुसऱ्याने लिहिले, “किती सभ्य आहे तो; त्याच्या आईने त्याच्यावर चांगले संस्कार केले आहेत. दुसरी कोणी व्यक्ती असती तर वाटेत उभ्या असलेल्या व्यक्तीला बाहेर ढकलेले असते.”
दरम्यान, सोशल मिडिया आणखी एका हत्तीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. श्रीलंकेत राजा नावाचा हत्ती प्रवाशांकडून “कर गोळा करण्याच्या” त्याच्या अनोख्या सवयीमुळे स्थानिक सेलिब्रिटी बनला आहे. त्याच्या वक्तशीरपणासाठी ओळखला जाणारा ४० वर्षांचा हत्ती बट्टाला-कटारागामा रस्त्याच्या कडेला उभा राहतो आणि रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांना थांबवतो. त्याची विनंती सोपी आहे ,”त्यांना पुढे जाऊ देण्याच्या बदल्यात तो काहीतरी अन्नाची अपेक्षा करतो.”
हेही वाचा – आयुष्य एवढं स्वस्त आहे का? संतापलेल्या हत्तीच्या नादी लागू नये अन्यथा.. थरारक क्षण Videoमध्ये कैद
जेव्हा वाहने थांबतो तेव्हा राजा आत्मविश्वासाने आपली सोंड उंचावतो आणि त्याच्या अन्नाची मागणी करतो. स्थानिक लोकही आवर्जून राजाला काही ना काही खायला देतात. स्थानिकांना राजाच्या दिनचर्येची आवड निर्माण झाली आहे