जगात अनेक प्रकारचे महाकाय प्राणी आहेत. जरी हे प्राणी अवाढव्य असले तरी त्यापैकी बरेच प्राणी हे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. यामध्ये हत्ती, जिराफ इत्यादींचा समावेश आहे. हत्ती आणि जंगलाचा राजा सिंह हे नैसर्गिक शत्रू आहेत. सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी अवाढव्य हत्तीसमोर त्याची अवस्था बिकट होते. हत्ती सिंहाला एका फटक्यात हरवू शकतात. अलीकडच्या काळात असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये हत्ती सिंहाची छेड काढतो आणि जंगलाचा राजा घाबरून तिथून पळ काढतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जात असले तरी ते हत्तींसमोरही कमजोर वाटतात. हत्तीचा एक फटका जंगलाच्या राजाला हरवू शकतो. आता हा व्हिडीओ पहा हत्तीने मस्तीत सिंहाची अवस्था बिघडवली आहे आणि या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट झाले आहे की जो जंगलातील सर्वात मोठा शिकारी समजला जातो तोच नेहमी जिंकतो असं नाही. काही वेळा धोकादायक शिकारींनाही मैदान सोडून तेथून पळावे लागते.

( हे ही वाचा: झोपलेल्या सिंहणीची सिंहाने काढली छेड; मग असं काही घडलं, ज्याने जंगलाचा राजा पूरता हादरला, पहा Video)

सिंह आणि हत्तीचा मजेशीर व्हिडीओ येथे पहा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जंगला मधला दिसत आहे. जिथे सिंह आनंदाने बसुन विसावा घेतोय. त्याला त्यावेळी याची देखील कल्पना नसते की पुढे त्याचे काय होईल. त्यानंतर तेथून जात असलेला हत्ती हळूहळू सिंहाजवळ येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. महाकाय प्राणी आपल्या दिशेने येताना पाहून जंगलाचा राजा एका सेकंदात तिथून पळ काढतो. व्हायरल व्हिडीओमध्ये हत्तीने सिंहाची अवस्था कशी बिघडवली हे तुम्हाला पुढे दिसेल. जीव वाचवण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो.

( हे ही वाचा: बिबट्याने केली अजगरावर हल्ला करण्याची चूक; काही क्षणात बदलला मृत्यूचा खेळ, पहा थरारक Video)

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर animalsinthenaturetoday नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत शेकडो लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स जिथे हत्तीच्या सामर्थ्याची प्रशंसा करत आहेत, तिथेच ते सिंहाच्या पलायनाचा आनंद घेत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant secretly attacks the king of jungle see how lion runs away to save his life gps