Elephant Shocking Video : हत्ती हा अतिशय शांत प्राणी मानला जातो. विनाकारण तो कोणाला त्रास देत नाही. पण, जर का तो पिसाळला, तर मात्र तो संपूर्ण जंगल हलवून सोडतो. हत्ती रागाच्या भरात अनेकदा इतका रुद्रावतार धारण करतात की, पाहणाऱ्याचाही थरकाप उडतो. अशा वेळी हत्ती समोर दिसेल त्याला पायाखाली चिरडायला मागे-पुढे पाहत नाही. सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक पिसाळलेला हत्ती कारला खेळण्यासारखे हवेत भिरकावतो. त्यानंतर तो हत्ती पुढे प्रवाशांनी भरलेल्या बसबरोबर असे काही करतो की, पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिसाळलेल्या हत्तीचा धडकी भरवणारा व्हिडीओ

ही घटना बिहारमधील सारणा जिल्ह्यात दसऱ्याच्या मिरवणुकीदरम्यान घडली आहे. पिसाळलेल्या हत्तीने अनेक वाहनांचे नुकसान केले आणि त्यानंतर रस्त्यात उभी असलेली एक कार हवेत भिरकावत दूर फेकली. यावेळी कारचालकाने कसातरी स्वत:चा जीव वाचवला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्या पिसाळलेल्या हत्तीने उडवून दिलेली दाणादाण त्यांच्या मोबाईलमध्ये टिपली. ते दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हत्तीने सोंडेद्वारे कार उचलली अन् दिली दूर फेकून

मिळालेल्या माहितीनुसार, दसरा मिरवणुकीत सहभागी करण्यासाठी एक हत्ती छपरा येथील सारणा जिल्ह्यामधल्या एकमा येथे आणला गेला होता. या मिरवणुकीदरम्यान हत्तीने अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि भररस्त्यात उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर हत्तीने सोंडेद्वारे एक कार उचलली आणि दूर फेकून दिली. अगदी एखाद्या खेळण्यातील कारप्रमाणे त्याने ती कार भिरकावली. हत्तीने अशा प्रकारे कारचा अक्षरश: चक्काचूर केला; मात्र कारमधील प्रवासी कसेतरी कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले.

हेही वाचा – रतन टाटांच्या अंत्ययात्रेत शंतनू नायडूला मुंबई पोलिसांनी रोखले; आयडी दाखवूनही….; नेमकं घडलं काय? पाहा Video

सोंडेने बसला जोरात धक्का देत तोडफोडीचा प्रयत्न

त्यानंतर हत्तीने कारप्रमाणे एका बसवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने सोंडेने जोरात धक्का देत बसची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, बसचे वजन जास्त असल्याने त्याला ते शक्य झाले नाही. त्यानंतर हत्ती पुढे सरकला. त्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण, हे सर्व विदारक दृश्य पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.

अनेकांनी हत्तीच्या माहुतावर संताप व्यक्त केला आहे. कारण- अशा गर्दीच्या ठिकाणी जर माहुत हत्तीवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होत नसेल, तर मग अशा जीवघेण्या परिस्थितीत लोकांनी काय करायचे? दरम्यान, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटते? नेमकी चूक कोणाची? हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा.