जरी अनेकांना पावसाळा खूप आवडत असला तरी पावसाळा सोबत विनाशही घेऊन येतो. आसाम, राजस्थान आणि केरळ या राज्यांना या मोठ्या विध्वंसाचा सामना करावा लागत आहे. मुसळधार व सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, सर्वत्र रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. यामुळे इथलं जीवनमान विस्कळीत झालं आहे. केरळच्या महापूराची भीषणता दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महापूराच्या पाण्यात हत्ती अडकला असल्याचं दिसून येत आहे. पूरात अडकलेल्या हत्तीला वाचवण्यासाठी वन विभागाची टीम प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तब्ब्ल सात तास बचाव मोहीम सुरू होती. याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीच्या जोरदार प्रवाहात एक हत्ती अडकला आहे. तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की त्याला हालचाल करता येत नाही. खरं तर, हत्ती पाण्यातून बाहेर पडून जंगलात जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु निसर्गाच्या कहरापुढे त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. मात्र, कसा तरी तो उंच ठिकाणी असलेल्या झाडाजवळ जाण्यात यशस्वी झाला, तेथून वनविभागाच्या लोकांनी त्याची सुटका केली.

आणखी वाचा : पुराच्या पाण्यात कारमध्ये अडकलेल्या महिलेचा पोलिसांनी असा वाचवला जीव, पाहा हा थरारक VIRAL VIDEO

हा व्हिडीओ केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील आहे. व्हिडीओमध्ये हत्ती पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडताना दिसत आहे. बरं, नंतर वनविभागाच्या पथकाने हत्तीला वाचवून योग्य ठिकाणी नेलं. एन. श्रीनाथ (एन श्रीनाथ) यांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक या सोशल मीडिया शेअर केले आहेत. यात एकूण तीन व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ लोक अगदी निरखून पाहत आहेत. इतक्या भयंकर महापुरातून हत्तीला कशा पद्धतीने वाचवण्यात आलं आहे, हे मोठ्या उत्सुकतेने लोक पाहत आहेत.

आणखी वाचा : जपानी यूट्यूबरने मुंबईच्या रस्त्यावर बसलेल्या आजोबांसाठी वडा पाव विकत घेतला, हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही भावूक व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : माकडाला जादू दाखवायला निघाला, मग पुढे जे घडतं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पाहा हा VIRAL VIDEO

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हत्ती पाण्याच्या जोरदार प्रवाहात कितीतरी तास अडकला होता. त्याचवेळी जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी हे पाहिलं आणि याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. हा हत्ती अन्नाच्या शोधात जंगलातून बाहेर पडला होता, पण परतत असताना महापूरात अडकला.

Story img Loader