Elephant Viral Video : जंगल परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरून वाहन चालवणं हे खरंच खूप कठीण काम आहे. कारण- कधी कोणता प्राणी समोर येईल ते सांगता येत नाही. वन विभागाकडूनही या भागात प्राण्यांपासून सावधान, असे फलक लावलेले दिसतात. कारण- प्राण्यांकडे दुर्लक्ष करणे चालकाला महागात पडू शकते. जंगल परिसरातून जाताना चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एक रिक्षासमोर अचानक पिसाळलेला हत्ती आला. या हत्तीने रिक्षाची वाट अडवून धरली. काही केल्या हत्तीनं वाट सोडली नाही. शेवटी रिक्षाचालकानं काय केलं हे आता तुम्हीच पाहा. त्यानं असं काही टॅलेंट दाखवलं की, जे पाहून आता नेटकरीसुद्धा आश्चर्यचकित होतायत.
हत्तीला पाहून चालकानं रिक्षा घेतली बाजूला अन्…
हा व्हिडीओ जंगलातील एका रस्त्यावरील आहे. या रस्त्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक ऑटोरिक्षा रस्त्यावरून भरधाव जात होती. पण, तेवढ्यात अचानक एक भलामोठा हत्ती रिक्षाची वाट अडवतो. हा हत्ती काही केल्या रस्त्यावरून बाजूला काही हटेना. बहुधा तो हल्ला करण्याच्या इराद्यानं वाट पाहत बसला होता. हत्तीला पाहून रिक्षाचालकानं रिक्षा बाजूला घेत निघून जाण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओत दिसेल की, रिक्षाचालक हत्तीच्या अगदी बाजूनं कट घेत निघून जाण्याच्या प्रयत्नात असतो.
मात्र, असे करताना चालकाचा रिक्षावरील ताबा सुटतो आणि अगदी हत्तीसमोर रिक्षा उलटी होते. रिक्षा उलटी होताच आतील प्रवासी घाबरतात आणि जीव वाचविण्यासाठी पळताना दिसत आहेत. यावेळी हत्तीनं कोणालाही दुखापत केली नाही. मा,त्र हा व्हिडीओ कुठला आहे ते अद्याप समोर आलेलं नाही.
हेही वाचा – पाठीमागून मृत्यू आला अन्…; रस्त्यावरील थरारक अपघात, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कोणाची?
@wildtrails.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर लोक मजेशीर कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, एक किलोमीटर आधी थांबला पाहिजे होता; पण जवळून कटिंग घेण्यासाठी पुढे आला. आणखी एका युजरने लिहिले आहे, याला एलिफंट अटॅक नाही, तर पॅनिक अटॅक, असे म्हणतात. तिसऱ्या युजरने लिहिले की, ऑटोचालकाची गुंडगिरी इथे चालणार नाही. चौथ्याने लिहिले की, तो काही करण्याआधीच रिक्षा उलटी झाली. आणखी एका युजरने लिहिले की, मॅच सुरू होण्यापूर्वीच हत्ती जिंकला.