Elephant Viral Video: हत्ती हा जमिनीवर राहणारा सर्वात शक्तिशाली प्राणी आहे. प्रचंड ताकदीसह त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता देखील आहे. हत्ती स्वभावाने खूप शांत असतात असे म्हटले जाते. पण जर त्यांना राग आला, ते चिडले तर त्यांच्या समोर येणारी प्रत्येक गोष्ट ते नाहीशी करु शकतात. मुळात या प्राण्याला त्रास दिल्याखेरीज तो कोणालाही त्रास देत नाही. सोशल मीडियावर हत्तींच्या कळपांचे, त्यांच्या लहान पिल्लांचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्रास दिल्यावर चिडलेल्या हत्तींचे व्हिडीओही आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हिडीओ तामिळनाडू राज्यामधील धर्मापुरी या ठिकाणचा आहे असे म्हटले जात आहे. धर्मापुरीतील होगेनक्कल वनपरिसरात एक जंगली हत्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तो रस्त्याच्या एका बाजूच्या झाडांजवळ उभा होता. आधीच वैतागलेल्या त्या हत्तीसमोर एक माणूस जात असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. तो माणूस हत्तीच्या जवळ जाऊ त्याला नमस्कार करताना दिसतो. त्या माणसाच्या येण्याने हत्ती अधिक चिडतो. पण त्या माणसावर हल्ला करत नाही. पुढे लुंगी घातलेला माणूस तेथे असलेल्या लोकांसमोर हात वर करुन उभा राहतो. तेव्हा हत्ती मागून धावत येत त्या माणसाला हुलकावणी देतो. त्यावेळेसही तो माणूस जागचा हलत नाही. चिडलेल्या हत्तीच्या जवळ जाण्याच्या कृत्यावर तो माणूस मद्यधुंद अवस्थेमध्ये होता असा अंदाज लावला जात आहे.

वन अधिकारी साकेत बडोला यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी हत्तीसमोर जाणाऱ्या त्या माणसाला मूर्ख म्हणत त्याच्यावर टिका केली आहे आणि त्या मूर्ख व्यक्तीला कोणतीही हानी न केल्याने हत्तीचे कौतुक केले आहेत. हा व्हिडीओ रमेश पांडे (वन अधिकारी) यांनीही रिशेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘ही कृती आत्मघातकी आहे, तरीही महाकाय प्राण्याने (हत्ती) त्याचा त्रास सहन केला आणि त्याला जीवंत जाऊ दिले”, असे म्हटले आहे.

Video: Army War College मध्ये घुसला वाघ; वन अधिकाऱ्यांनी केली शोधमोहिमेला सुरुवात, सीसीटिव्ही फुटेज होतय व्हायरल

हा व्हिडीओ ट्विटरसह अन्य सोशल मीडिया साइट्सवरही व्हायरल होत आहे. विनाकारण धाडस दाखवणाऱ्या त्या मूर्ख माणसावर नेटकरी मोठ्या प्रमाणावर टीका करत आहेत.