हत्ती तसा स्वभावाने शांत प्राणी आहे. अनेकांना त्याचा जिव्हाळा असतो. हत्तीचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही राजेश खन्ना आणि राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या भूमिका असलेला ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट पाहिला असेल. त्या चित्रपटात राजेश खन्ना आणि हत्तीची मैत्री, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम दाखवलंय, अगदी तसाच एक गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये झोपेत असलेल्या एका मुलीला जागण्यासाठी हत्ती थेट खिडकीबाहेर आला असल्याचं दिसून येतोय.

हत्तीच्या जीवनात माणसाचं वेगळंच महत्व आहे. एवढा विशालकाय देह पाच साडे पाच फुटाच्या माणसाचे ऐकतो. माणूस जसं सांगेल तसं तो वागतो. ज्या पद्धतीने हत्ती प्रेम करतो तसंच माणसाने देखील तसंच प्रेम करावं अशी अपेक्षा हत्तीची असते. गेल्या काही दिवसात हत्ती आणि माणसात झालेल्या संघर्षाचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. त्यामुळे हत्तींबाबत माणसांमध्ये भीती आणखी वाढली. हत्ती बुद्धिमान आणि शांत स्वभावाचे असतात. त्यांना असुरक्षित वाटले तर ते हल्ला करतात. पण हत्तीने माणसाला स्वीकारलंय तसंच माणसाने हत्तीला स्वीकारायला हवं असं सांगणारा हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो.

आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या माकडाने मुलीला अशी घडवली अद्दल, पाहा हा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी खिडकीच्या शेजारी गाढ झोपेत असते. अचानक तिच्या खिडकीतून काहीतरी हालचाल करताना दिसून येतं. ते दुसरं तिसरं काही नसून हत्तीची सोंड असते. या मुलीला झोपेतून जागं करण्यासाठी हत्ती आपल्या सोंडेच्या मदतीने उठवण्याचा प्रयत्न करतो. गाढ झोपेत असताना आपल्या खिडकीत महाकाय हत्तीला पाहून ही मुलगी सुरूवातीला काही वेळासाठी घाबरून जाते. पण नंतर हत्तीला पाहून ती पलंगावर उठून बसते.

आणखी वाचा : बाबा रे! मॉलमध्ये मुलीने मुलाला लाथा-बुक्क्या आणि चपलीने धू-धू धुतलं, या मारहाणीचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ थायलंडमधला आहे. थायलंडमध्ये असलेल्या चियांग माई रेसॉर्टमध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. या रेसॉर्टमध्ये आलेल्या पर्यटकांना सकाळी झोपेतून जागं करण्यासाठी कोणताही अलार्म किंवा रिसेप्शन कॉल येत नाही. चक्क हे महाकाय आणि तितकेच गोंडस हत्ती स्वतः तुम्हाला जागे करण्यासाठी तुमच्या खिडकीजवळ येतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इतकंच नव्हे तर तुम्ही तिथल्या हत्तींसोबत खेळू शकता आणि अंघोळ देखील करू शकता. त्यामूळे हा अनुभव काही वेगळाच असतो.

आणखी वाचा : किती गोड! बाप-लेकीच्या घट्ट नात्याचा VIDEO VIRAL, पाहून तुम्हीही व्हाल भावूक

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अजब! उंच इमारतीवरून ही चिमुकली खाली पडली तरी जीव वाचला! असा कोणता चमत्कार घडला? पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून तो कंटेंट क्रिएटर साक्षी जैन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. साक्षी ही थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आली होती. त्यावेळी हत्ती तिला झोपेतून जागे करण्यासाठी आल्यानंतर हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५५ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २.३ मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय.

Story img Loader