कधीकधी इंटरनेटवर खूप मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ आढळतात. हे व्हिडीओ इतके क्यूट असतात की ते पाहिल्यानंतर यूजर्सच्या चेहऱ्यावर हसू उमटते. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक हत्ती आणि एक माहूत बसलेला दिसत आहेत. या व्हिडीओमधल्या माहूत आणि हत्तीमधली बॉण्डिंग पाहून तुमच्याही चेहऱ्यावर एक स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक माहूत एका मंदिर परिसरात पायऱ्यांवर बसलेला दिसून येत आहे. पायऱ्यांवर बसून तो आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात व्यस्त असलेला दिसून येतोय. त्याच्या शेजारी एक महाकाय हत्ती सुद्दा बसलेला दिसून येतोय. हा हत्ती त्याच्या मागून हळूच त्याच्या फोनमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अनेकदा आपण ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करत असताना आपल्या शेजारी बसलेल्या कुणीतरी मोबाईलमध्ये स्क्रीन स्कोल करत पाहत असताना आपली नजर आपसूक त्याच्या मोबाईल स्क्रीनकडे जाते. इतकंच नव्हे तर तो मोबाईलमध्ये काय पाहतोय, हे जाणून घेण्यासाठी हळूच डोकावणारे अनेक व्यक्ती आपल्याला दिसतात. मोबाईलचे हे व्यसन फक्त माणसालाच नव्हे तर प्राण्यांना सुद्धा लागलंय.

प्राणी सुद्धा आता माणसाप्रमाणेच मोबाईलच्या अधीन होत चालले आहेत. याचंच उत्तम उदाहरण देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओमध्ये हत्ती आपल्या माहूताच्या शेजारी बसून दोघे मोबाईलमध्ये पाहताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमधली हत्ती आणि माहूताची बॉण्डिंग पाहून सारेच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा : पार्सल ट्रक पाहून बेशुद्ध होण्याचे नाटक करणाऱ्या शेळ्यांचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : यापैकी एक अंड थोडं वेगळं आहे! यामागचं कारण जाणून घेण्यासाठी पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ kerala_elephants नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २ लाख ७८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.