Elephant Viral News: आयुष्यात आई आणि मुलांमधील प्रेमाची तुलना इतर कुठल्याच नात्याबरोबर होऊ शकत नाही. आईसारखे प्रेम आपल्याला कधीही कोणीही करत नाही, त्यामुळे आईच्या प्रेमाची जाणीव आपल्या सर्वांनाच असते. आई तिच्या मुलांवर जेवढे प्रेम करते, तेवढीच ती प्रसंगी त्यांच्यावर रागावते, ओरडते आणि वेळ पडल्यास त्यांना चोपही देते. आई आणि तिच्या मुलांमधील हे खास नाते खूप अनमोल आहे. आई आणि मुलांच्या प्रेमाचे असे अनेक गोड किस्से सोशल मीडियामुळे आपल्याला सतत पाहायला मिळत असतात. दरम्यान, सध्या असाच एक फोटो व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

जन्म देणारी आई एखादी महिला असो किंवा प्राणी तिचे आपल्या पाल्यावर जीवापाड प्रेम असते. असे आई आणि मुलांचं प्रेम फक्त माणसांमध्येच नाही, तर अनेकदा प्राण्यांमध्येही दिसून येते. समाजमाध्यमावर अनेकदा प्राणी आणि त्यांच्या पिल्लांचे व्हिडीओ समोर येतात. त्यात कधी गाय आणि तिचे वासरू असते, तर कधी मांजर आणि तिची पिल्लं असतात. यातील काही व्हिडीओ अनेकदा हृदयस्पर्शी असतात, सध्या असाच एक फोटो खूप चर्चेत आला आहे.

व्हायरल फोटोमध्ये काय आहे?

हा व्हायरल फोटो ओडिशाच्या जंगलातील असून या फोटोमध्ये एक हत्ती त्याच्या आईचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी हत्ती त्याच्या आईच्या शरीरावर उभा होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा हत्ती आपल्या आईच्या मृतदेहाजवळ दिवसभर उभा राहून आईच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत होता. समोर आलेल्या फोटोमध्ये हत्ती आईला उठवण्याचा आणि पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हा फोटो IFS अधिकारी सुसांता नंदा यांनी त्यांच्या X(ट्विटर) अकाउंटवर शेअर केला असून या घटनेचा फोटो शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “उत्तर ओडिशाच्या जंगलातील माता वृद्धापकाळाने मरण पावली. कळपातील उप-प्रौढ हत्ती शोक करत राहिला आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत जवळजवळ एक दिवस जागचा जराही हलला नाही.”

हेही वाचा: ‘कर्म इथेच फेडावे लागतात…’ श्वानाला तलावात फेकणाऱ्या तरुणीबरोबर घडलं असं काही VIDEO पाहून बसेल धक्का

पाहा व्हिडीओ:

हा फोटो X(ट्विटर)वरील @Susanta Nanda या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाल्या आहेत, तसेच हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. यावर नेटकरीदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या फोटोवर एका युजरने लिहिलंय की, “धन्यवाद हा फोटो शेअर केल्याबद्दल”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खूप वाईट”, तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “खूप हुशार, ताकदवान आणि मनाने भावनिक प्राणी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मला खूप वाईट वाटलं हे पाहून.”