हत्तीला मुक्तपणे फिरताना पाहणं हा वन्यजीव प्रेमींसाठी एक रोमांचकारी अनुभव असू शकतो. अशा परिस्थितीत एखाद्या हॉस्पिटलमध्ये हत्ती फिरताना दिसला तर कोणासाठीही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. दोन जंगली हत्ती कॉरिडॉरमध्ये फिरताना पाहून हॉस्पिटलमधील लोकांना असाच धक्का बसला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन जंगली हत्ती हॉस्पिटमध्ये फिरताना दिसून आले. हा व्हिडीओ पाहून तुम्हाचा सुद्धा आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बंगालमधला आहे. इथल्या जलपाईगुडी जिल्ह्यातील बिन्नागुरी येथील आर्मी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये हत्ती घुसले. एका फोटोमध्ये दोन हत्ती एका इमारतीच्या आतील हॉलमध्ये फेऱ्या मारताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये हत्ती दरवाजाकडे झुकलेला दिसत आहे. नंतर हत्तींनी काही खोल्यांच्या भिंती तसेच काही फर्निचरचे नुकसान केल्याचे देखील सांगण्यात आले. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनीही हत्तींचे साहस दाखवणारे हे फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर ते सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत.

इथे पाहा व्हायरल फोटोज :

आणखी वाचा : हिजाब घालून ओणम साजरा करणाऱ्या विद्यार्थिनींचा VIDEO VIRAL

सुशांत नंदा यांनी फोटोंना कॅप्शन देताना लिहिले की, “खोलीत हत्ती… जलपाईगुडी छावणीतून.” इमारतीत हत्ती फिरताना पाहून कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अशा खोल्यांमध्ये हत्ती फिरताना पाहून लोकांनाही आश्चर्य वाटलं. काही यूजर्सनी मानव-प्राणी संघर्षाचा मुद्दाही उपस्थित केला.

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Kala Chashma गाणं परदेशातही हिट, आफ्रिकन भावंड किली आणि नीमाचा नवा VIDEO VIRAL

एका यूजरने लिहिले की, “मला जे समजले त्यावरून रुग्णालयात सर्व काही ठीक आहे की नाही हे पाहणे ही एक आश्चर्यकारक होतं!” दुसर्‍या यूजरने लिहिले की, “जेव्हा आपण त्यांच्या जागेवर हल्ला करतो तेव्हा यापेक्षा उलट होतं.” तिसऱ्या यूजरने कमेंट केली की, “माझ्या अंदाजाप्रमाणे जेव्हा तुम्ही त्यांचे निवासस्थान ताब्यात घेता आणि त्यावर बांधकाम करता तेव्हा असंच होईल. ही त्यांची जमीन आहे आणि ती त्यांना परत हवी आहे.”

आणखी वाचा : मुंबई पोलीस अधिकारी आणि चिमुकलीचा हा क्यूट VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इमारती फोडणाऱ्या हत्तींचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये, थायलंडमध्ये स्वयंपाकघरात अन्न खाण्यासाठी एक हत्ती ओरडताना आढळला होता. स्वयंपाकघरात घुसलेल्या हत्तीचा व्हिडीओ सुद्धा त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Story img Loader