आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो. हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही. हॉस्पिटलमध्येही आता लिफ्ट असतात, बऱ्याचदा पेशंटसाठी लिफ्टचा वापर केला जातो, आजारी पेशंटमध्ये जिन्याने वर खाली करण्याची ताकद नसते त्यामुळे लिफ्टचा वापर केला जातो. मात्र ही लिफ्ट जेवढी कामाची आहे तेवढीच रिस्क सुद्धा आहे, याच लिफ्ट दुर्घटनेच्या आपण अनेक घटना एकतो. अशीच एक हॉस्पिटलमधल्या लिफ्ट दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हायरल व्हडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून लिफ्टमध्ये नेलं जात आहे. रुग्णालयाचे दोन कर्मचारी आणि सोबत त्या रुग्णाची नातेवाईक आहे. एक कर्मचारी स्ट्रेचर घेत आत जातो. स्ट्रेचर अर्ध लिफ्टच्या आत आणि अर्ध लिफ्टच्या बाहेर असतं. म्हणजे स्ट्रेचरवरून रुग्णाचं धड आत आणि पाय बाहेर असतात. यावेळी या पेशंटसोबत त्याचे नातेवाईकसुद्धा आहे. यावेळी डॉक्टर, नातेवाईक आणि आजुबाजूच्या लोकांनी पेशंटला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला मात्र, तो तसाच खाली गेला. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: नाक घासलं, लेकीसमोर हात जोडून रडला बाप, तरी पाठ फिरवून प्रियकरासोबत निघून गेली
योग्य देखभाल न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप रुग्णांनी केला असून आता हॉस्पिटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.