आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो. हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही. शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती असणं हे सामान्य आहे. अशा परिस्थितीत या इमारतींपैकी एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लोक लिफ्टचा वापर करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र या लिफ्ट लोकांसाठी जीवघेण्या ठरत असल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे. त्‍यामुळे आपण सर्वांनी यापूर्वी मोठमोठे अपघात झालेले पाहिले आहेत. अशाच एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

दोन तासांनंतर केली सुखरुप सुटका

इंदोरच्या टिळक नगरमध्ये चौथ्या मजल्यावर अचानक लिफ्ट बंद पडल्याने आई आणि मूल अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यानंतर पोलिसांच्या पथकाने तत्परतेने त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून त्यांची सुटका केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलिसांची मोठी टीम याठिकाणी दाखल झाली आहे. सोबत महिला कॉन्स्टेबलसुद्धा आहेत. यावेळी सर्वांनी शर्तीचे प्रयत्न करुन माय-लेकाला यातून बाहेर काढलंय. पोलिसांच्या या कामगीरीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ज्या बापामुळे यश मिळालं…त्या बापाला डोक्यावर घेतलं! अधिकारी संतोष खाडेचा Video viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लिफ्टचं वेळीच मेंटेनन्स आणि ऑडिट करणं गरजेचं आहे. नाहीतर, दिरंगाईमुळे मोठी दुर्घटना घडू शकते.