पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशमधल्या विजयाच्या शुभेच्छा देणारे पत्र ११वर्षांच्या पाकिस्तानी मुलीने लिहिले आहे. मोदींनी भारतीयांची मने जिंकली आहेत आणि याच प्रेमाच्या जोरावर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आता पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी यासाठी मोदींनी प्रयत्न करावे, यामुळे ते भारतीयांबरोबरच पाकिस्तानी जनतेचीही मने जिंकून घेतील अशा आशयाचे पत्र तिने लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लहोर येथे राहणा-या अकिदाद नावेद नावाच्या मुलींने मोदींना पत्र लिहिले. या पत्रातून तिने उत्तर प्रदेशमधल्या विजयाबद्दल मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माणसांची मने जिंकून घेणे हे सगळ्यात कठीण काम असते पण यासारखे चांगले कामही दुसरे नसते. कदाचित यामुळेच तुम्ही उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकलात. पण आणखी भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांची मने जिंकून घायची असतील तर एक पाऊल पुढे टाकून तुम्ही शांततेसाठी प्रयत्न करायला हवा. दोन्ही देशांना शांतता नांदावी असेच वाटत आहे. तेव्हा शांततेसाठी  प्रयत्न करूयात. या पुढे बंदुका नाही तर पुस्तक खरेदी करूयात, गोळ्या नाही तर गरिबांसाठी औषध खरेदी करू अशा आशयाचे पत्र तिने मोदींना लिहिले असल्याचे दुनिया न्यूज टीव्हीने म्हटले आहे. तिने दोन पानांचे पत्र मोदींना लिहिले आहे. यापूर्वीही तिने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिले होते.

(छाया सौजन्य : अहमद नावेद/ फेसबुक)