Viral Video : एलिस पेरी ही एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे जी भारतात महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाते. जगभरात तिचे लाखो चाहते आहे. महिला प्रीमियर लीगमुळे ती भारतात सुद्धा खूप लोकप्रिय आहे आणि दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.उत्कृष्ट क्रिकेटरबरोबरच ती दिसायलाही तितकीच सुंदर आहे.सोशल मीडियावर अनेक चाहते तिच्याविषयी प्रेम व्यक्त करत असतात.
नुकतीच भारतात महिला प्रीमियर लीग पार पडली. या लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दणदणीत विजय मिळवला. अंतिम सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि या संघाच्या महिला खेळांडूचे अनेक जुने नवे व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच एलिस पेरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एलिस पेरी सुंदर काळ्या रंगाच्या साडीमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.एलिस पेरी खूप सुंदर दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ आरसेबीच्या एका पार्टीतील आहे. या पार्टीमध्ये तुम्हाला अनेक महिला क्रिकेटर दिसेल पण एलिस पेरीने तिच्या लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एलिसने सुंदर काळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि पांढऱ्या रंगाचे ब्लाउज घातले आहे. तिने फॅन्सी गॉगल घातला आहे आणि कानात झुमके घातले आहे. एलिस या भारतीय लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला ती सुंदर डान्स करताना दिसेल. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हसू पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video : ‘पापा की परी’नी घराच्या छतावर चढवली स्कुटी, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

Uddesh11Narayan या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” ती फलंदाजी करू शकते, ती गोलंदाजी करू शकते. ती नाचू शकते, ती साडी नेसू शकते, ती मुंबईला हरवू शकते” इन्स्टाग्राम, एक्सवर एलिसचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी तिच्या या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader