Viral Video : एलिस पेरी ही एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे जी भारतात महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाते. जगभरात तिचे लाखो चाहते आहे. महिला प्रीमियर लीगमुळे ती भारतात सुद्धा खूप लोकप्रिय आहे आणि दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.उत्कृष्ट क्रिकेटरबरोबरच ती दिसायलाही तितकीच सुंदर आहे.सोशल मीडियावर अनेक चाहते तिच्याविषयी प्रेम व्यक्त करत असतात.
नुकतीच भारतात महिला प्रीमियर लीग पार पडली. या लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दणदणीत विजय मिळवला. अंतिम सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि या संघाच्या महिला खेळांडूचे अनेक जुने नवे व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच एलिस पेरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एलिस पेरी सुंदर काळ्या रंगाच्या साडीमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.एलिस पेरी खूप सुंदर दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा