जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी आज पहाटे म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी मोठी घोषणा केली आहे. इलॉन मस्क ट्विटरसोबतचा करार मोडल्यानंतर सध्या कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. त्यांनी ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर त्यांनी हा करार रद्द केला.
ट्विटरबरोबरची डील रद्द झाल्यांनतर त्यांनी आता प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेतला आहे. या गोष्टीची माहिती देताना त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, ‘मी मँचेस्टर युनायटेड विकत घेत आहे. तुमचे स्वागत आहे.’ दरम्यान, या डीलबाबत अद्याप त्यांनी कोणतीही माहिती दिली नसून या कराराचा पाठपुरावा करण्याची त्यांची योजना काय आहे आहे हेदेखील त्यांनी सांगितले नाही.
सध्या अमेरिकन ग्लेझर कुटुंबाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या मँचेस्टर युनायटेड संघाने, मस्क यांच्या ट्वीटवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मँचेस्टर युनायटेड जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लबपैकी एक आहे. हा संघ तब्बल २० वेळा इंग्लंडचा चॅम्पियन बनला आहे आणि त्यांनी जागतिक खेळातील सर्वात प्रतिष्ठित क्लब स्पर्धा युरोपियन कप तीनवेळा जिंकला आहे.
“अरे बहुत जगह हैं”चं फीमेल व्हर्जन सोशल मीडियावर होतंय व्हायरल; Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
१६ ऑगस्ट रोजी या फुटबॉल संघाचे बाजारमूल्य २.०८ दशलक्ष डॉलर म्हणजेच १६,४७४ कोटी रुपये इतके होते. मैदानावरील संघाच्या वाईट प्रदर्शनामुळे मँचेस्टर युनायटेडच्या समर्थकांनी अलीकडेच ग्लेझर्सचा निषेध केला आहे. ग्लेझर कुटुंबाने २००५ मध्ये ७९० दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे ७,५८१ कोटी रुपयांना क्लब खरेदी केले होते. गेल्या वर्षी मँचेस्टर युनायटेड युरोपियन सुपर लीगपासून वेगळे होण्याच्या अयशस्वी प्रयत्नात सामील झाल्यानंतर ग्लेझरविरोधी चळवळीला वेग आला.
चिमुकल्याने गायलेलं गोंडस राष्ट्रगान ऐकून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध; हा Viral Video एकदा पाहाच
दरम्यान, मँचेस्टर युनायटेड विकत घेत असल्याच्या मस्क यांच्या ट्वीटला काही मिनिटांत सोशल मीडिया युजर्सनी हजारो लाइक्स दिले आणि त्यावर मजेदार कमेंट्स केल्या.