Memes on Twitter : एलॉन मस्क यांनी सोमवारी ट्विट करत ट्विटरच्या नव्या लोगोची घोषणा केली. एलॉन मस्क यांनी निळ्या रंगातील चिमणीचा लोगोच्या जागी ‘X’ हा इंग्रजी आद्याक्षर असलेला नवा लोगो आणला आहे. सध्या हा लोगो सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही युजर्स या नव्या अपडेटवर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काही युजर्सनी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे. यातील काही मीम्स प्रचंड व्हायरल झाले आहे.
एका युजरने सुरुवातीपासून ट्विटरचा लोगो कसा बदलण्यात आला, याचा एक फोटो शेअर केला आहे २००६ पासून ते २०२३ पर्यंत ट्विटरच्या लोगोमध्ये झालेले बदल यात दाखवण्यात आले आहे.
एका फोटोमध्ये ट्विटरचा लोगो असणारी चिमणी रडत आहे आणि सांगते की तिला कामावरुन काढून टाकले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “बाय आमची मैत्रीण, तु नेहमी आठवणीत राहशील.”
एका युजरने चिमणीचे अंत्यसंस्कार करत असल्याचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शममध्ये लिहिले, “भावपूर्ण श्रद्धांजली(२००६-२००९).
एका मीममध्ये चिमणी आणि ट्विटरचा नवा लोगो ‘X’ समोरासमोर दिसत आहे. त्यात ‘X’ चिमणीला ‘गेटआऊट’ म्हणत आहे तर चिमणी ‘गुड बाय’ म्हणत आहे.
एका युजरने भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एलॉन मस्कचा बनावटी चेहरा लावलेला एक व्यक्ती गाडीत बसले आहे आणि एक चिमणी विक्रेता त्यांच्या हातात एक एक चिमणी देत आहे. एलॉन मस्क मात्र प्रत्येकवेळी चिमणीला उडवत आहे, असे व्हिडीओत दाखवले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “एलॉन मस्क यांनी अखेर चिमणीला स्वतंत्र केले.”