‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्या एलॉन मस्कचं एक ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आहे. मस्क यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये चार एफएमसीजी कंपन्यांची नावं आहेत. या प्रत्येक नावातीलमधील काही अक्षरांभोवती वर्तुळ करण्यात आलंय. या सर्व अक्षरांना एकत्रितपणे वाचल्यास सातोषी नाकामोटो (Satoshi Nakamoto) हे नाव तयार होतं.
नक्की वाचा >> जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्क यंदाच्या वर्षी किती कर भरणार ठाऊक आहे का?; आकडा पाहून व्हाल थक्क
सातोषी नाकामोटो या नावाची व्यक्ती बिटकॉन्सचे जनक असल्याचं मानलं जातं. मात्र बिटकॉन्सच्या निर्मितीबद्दल मतमतांतरे आहेत. बिटकॉन्सची निर्मिती कोणी केलीय यासंदर्भातील खरी माहिती अद्याप समोर आलेली नाही. वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगल्या व्यक्तींनी बिटकॉन्ससंदर्भातील कोडिंग केल्याचं सांगितलं जातं. काही तासांमध्ये साडेसोळा हजारांहून अधिक जणांनी या ट्विटला कमेंट करुन रिप्लाय दिलाय. तर तीन तासांमध्ये हा फोटो ४० हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केलाय.
नक्की वाचा >> कामादरम्यान FB पाहण्याची सवय मोडण्यासाठी नेमली कानाखाली मारणारी महिला ‘स्लॅपर’; एलॉन मस्कलाही आवडली कल्पना, म्हणाला…
विशेष म्हणजे स्वत: एलॉन मस्क हाच सातोषी नाकामोटो असल्याचा दावाही काही वर्षांपूर्वी करण्यात आलेला. मात्र २०१७ साली त्याने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र आता एलॉनने हा कोड्यात टाकणारा फोटो पोस्ट केल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलंय.
बिटकॉन्सबद्दलची माहिती नसणाऱ्यांना नाकामोटो कोण आहे हे इतर लोक समजवून सांगताना ट्विटखालील रिप्लायमध्ये दिसतंय. “सातोषी नाकामोटो हे नाव एक टोपणनाव असल्याचं मानलं जातं. हे नाव एक व्यक्ती किंवा व्यक्तींचं असून त्यांनी बिटकॉन्स बनवण्याचं मानलं जातं. त्यांनीच बिटकॉनसंदर्भातील व्हाइट पेपर तयार केला तसेच बिटकॉनच्या वापरासंदर्भातील माहिती देण्यातही त्यांचाच पुढाकार होता,” असं एकाने गोंधळेल्या लोकांना सांगितलंय. अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रियाही दिल्यात.
१)
२)
३)
४)
५)
काहींनी आता या ट्विटमुळे बिटकॉन्सची किंमत पुन्हा वाढणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. खरोखरच एलॉन मस्कने यापूर्वीही अशाप्रकारे क्रिप्टोकरन्सीसंदर्भात केलेल्या ट्विटमुळे अनेकजण रातोरात कोट्याधीश झाल्याची उदाहरणं आहेत. मात्र या ट्विटमधून मस्कला नेमकं काय म्हणायचंय हे स्पष्ट झालेलं नाही.