एलॉन मस्क हा जगातील सर्वात बुद्धिवान उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याला खऱ्या आयुष्यातला आयर्नमॅन असेही म्हटले जाते. गेल्या काही काळात विजेवर चालणाऱ्या टेस्ला कार व स्पेस एक्समध्ये सुरु असलेल्या स्पेस रॉकेटच्या संशोधनामुळे चर्चेत असलेला एलॉन मस्क सध्या ट्विटरवरील मिम्समूळे चर्चेत आहे. त्याने हॉलीवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन उर्फ डब्लू डब्लू ई सुपरस्टार रॉकच्या अवतारातील फोटो ट्विटरवर शेअर केले. रॉकच्या फोटोंवर एलॉन मस्कचा चेहरा असलेले हे मिम्स पाहता पाहता ट्विटवर व्हायरल झाले. काही क्षणातच एलॉन मस्कच्या या पोस्टला नेटीझन्सनी चांगलाच प्रतिसाद दिला. ६.९ लाख लोकांनी त्याचे मिम्स लाईक केले तर १.२ लाख लोकांनी त्या पोस्टला रीट्विट केले.

दिवसातील सरासरी १८ तास काम करणारा एक हरहुन्नरी उद्योजक अशी एलॉन मस्कची ओळख आहे. अद्यायावत तंत्रज्ञानावर सातत्याने संशोधन हे त्याचे सर्वात आवडते काम परंतु या मिस्ममुळे त्याच्या स्वभावातला आणखीन एक पैलू जगासमोर आला आहे.

Story img Loader