Elon Musk Trending News: ट्विटर ताब्यात घेतल्यावर एलॉन मस्क यांचे नाव काही ना काही कारणाने सतत चर्चेत आहे. यावेळेस मात्र मस्क यांच्या नावाची चर्चा जरा घाबरूनच सुरु आहे. अलीकडेच ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी आपया बेडरूममधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यात काही गोष्टी बघून नेटकरी चांगलेच हादरून गेले आहेत. असं नेमकं या फोटोमध्ये काय आहे, चला पाहुयात…
एलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये बेडच्या बाजूला असणारा ड्रेसिंग टेबल दिसत आहे. या टेबलवर चार डाएट कोकचे कॅन, एक बंदूक व एक किचेन व दोन अत्यंत सूचक फोटो दिसत आहेत. एक फोटो हा डेलावेर नदी ओलांडताना जॉर्ज वॉशिंग्टनचे पेंटिंग असल्याचे समजत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये वज्र दोर्जे नावाची एक बौद्ध धार्मिक विधी सुरु असल्याचे दिसत आहे. मस्क यांनी हे फोटो व त्याच्या बाजूला ठेवलेली बंदूक पाहता सगळेच बुचकळ्यात पडले आहेत, यातून मस्क काही सुचवू इच्छितात का अशाही चर्चा ऑनलाईन सुरु झाल्या आहेत.
दरम्यान मस्क यांनी शेअर केलेल्या फोटोत डाएट कोकचे चार मोठे कॅन पाहूनही अनेकांना आश्चर्य वाटत आहे. याच आश्चर्यावरून केलेल्या कमेंटला मस्क यांनी मात्र मजेशीर उत्तर देत माफ करा माझ्याकडे कॅन ठेवायला कोस्टर नाही आणि यासाठी माझ्याकडे काही कारणही नाही असे म्हंटले आहे. तर यापुढील दुसऱ्याच ट्विटमध्ये मस्क “नमस्कार, मी मस्केट आहे, एलॉन मस्केट” असे म्हणत आहेत. या सर्व ट्वीटचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे कि मस्क ट्विटरवर काहीश्या मस्करीच्या मूडमध्ये हे ट्वीट्स करत होते हे येत्या काही दिवसात समजेलच.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान अलीकडेच मस्क आणि स्टीफन किंग यांच्यात ट्विटरवर काही मजेशीर गप्पा झाल्या होत्या. स्टीफन किंग म्हणाले की “मला वाटते एलॉन मस्क एक दूरदर्शी आहे. जवळजवळ एकट्याने, त्याने ऑटोमोबाईल्सबद्दल अमेरिकन लोकांच्या विचारसरणीत बदल केला आहे. माझ्याकडे टेस्ला आहे आणि मी फॅन आहे. ट्विटरसाठी मस्क हे एक कणखर नेतृत्व ठरेल असेही स्टीफन किंग यांनी म्हंटले आहे.